पत्रकाराला चीनमध्ये सात वर्षांचा कारावास

By admin | Published: April 18, 2015 12:17 AM2015-04-18T00:17:42+5:302015-04-18T00:17:42+5:30

सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांचा प्रखर शब्दांत समाचार घेणाऱ्या ज्येष्ठ चिनी महिला पत्रकारास न्यायालयाने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Journalist sentenced to seven years in China | पत्रकाराला चीनमध्ये सात वर्षांचा कारावास

पत्रकाराला चीनमध्ये सात वर्षांचा कारावास

Next

बीजिंग : सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांचा प्रखर शब्दांत समाचार घेणाऱ्या ज्येष्ठ चिनी महिला पत्रकारास न्यायालयाने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पक्षाशी संबंधित गोपनीय परिपत्रक एका संकेतस्थळावर सार्वजनिक केल्याच्या आरोपाखाली शुक्रवारी ही शिक्षा ठोठावण्यात आली.
गाओ यू (७१) चीनच्या प्रमुख पत्रकारांपैकी एक आहेत. सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचा कठोर शब्दांत समाचार घेणारे लेख लिहिण्यासाठी ओळखल्या जातात. गाओ यू यांना बीजिंगच्या न्यायालयाने पक्षाचे अंतर्गत दस्तऐवज फोडल्याप्रकरणी दोषी आढळले व शिक्षा सुनावली. गाओंचे वकील मो शाओपिंग यांच्या मते, सरकारने आपल्या अशिलावर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाद्वारे २०१३ मध्ये जारी एक अत्यंत गोपनीय ‘दस्तऐवज क्रमांक ९’ चिनी भाषेतील एका परदेशी वृत्तसंस्थेला दिल्याचा आरोप होता.
 

Web Title: Journalist sentenced to seven years in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.