पुलवामा हल्ल्यामागे जैशचा हात नाहीच, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा कांगावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 10:38 AM2019-03-02T10:38:48+5:302019-03-02T10:43:08+5:30

एकीकडे भारतासमोर शांततेचे प्रस्ताव ठेवून साळसूदपणाचा आव आणत असलेल्या पाकिस्तानची कांगावाखोरी सुरूच आहे.

Jaish is not behind the Pulwama attack, Pakistan's Foreign Minister | पुलवामा हल्ल्यामागे जैशचा हात नाहीच, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा कांगावा 

पुलवामा हल्ल्यामागे जैशचा हात नाहीच, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा कांगावा 

googlenewsNext
ठळक मुद्देकीकडे भारतासमोर शांततेचे प्रस्ताव ठेवून साळसूदपणाचा आव आणत असलेल्या पाकिस्तानची कांगावाखोरी सुरूचपुलवामा हल्ल्याबाबत आमच्या निकटवर्तीयांनी जैश ए मोहम्मदकडे विचारणा केली होती. मात्र त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला.'' असे शाह मोहम्मद कुरैशी म्हणाले

इस्लामाबाद - एकीकडे भारतासमोर शांततेचे प्रस्ताव ठेवून साळसूदपणाचा आव आणत असलेल्या पाकिस्तानची कांगावाखोरी सुरूच आहे. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सबळ पुरावे दिल्यानंतरही या हल्ल्यामागे जैश ए मोहम्मदचा हात असू शकत नाही, अशी ओरड  सुरू केली आहे. 

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझहर याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या संघटनेने स्वीकारली आहे अशी विचारणा झाली असता जैश ए मोहम्मदने हे कृत्य केलेले नाही, असा दावा केला.  "पुलवामा हल्ल्याबाबत आमच्या निकटवर्तीयांनी जैश ए मोहम्मदकडे विचारणा केली होती. मात्र त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला.'' असे शाह मोहम्मद कुरैशी म्हणाले. मात्र जैशशी कुणी संपर्क साधला होता, हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. 

 यावेळी युद्ध हा पर्याय नसल्याचा दावाही त्यांनी केला. ''आजच्या घडीला युद्ध हा कुठल्याही समस्येवर तोडगा ठरू शकत नाही. एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागल्याने समस्या सुटणार नाही. मात्र युद्ध करणे हे आत्मघाती पाऊल ठरू शकते.'' असा दावा कुरैशी यांनी केला. 
दरम्यान,  पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची चौफेर कोंडी झाली आहे. एकीकडे पाकिस्तान शांततेच्या बाता मारत असताना दुसरीकडे मसूद अझहरबाबतचा त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला. आहे.  पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतावादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान पुरावे  मागत आहे. तर दुसरीकडे मसूद अझहर हा पाकिस्तानातच असून, तो आजारी असल्याने घरातून बाहेरही पडू शकत नाही, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी काल केला होता.  

Web Title: Jaish is not behind the Pulwama attack, Pakistan's Foreign Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.