इस्रायलच्या माजी पंतप्रधानांना ८ महिन्यांची कैद

By admin | Published: May 26, 2015 01:42 AM2015-05-26T01:42:10+5:302015-05-26T01:42:10+5:30

इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Israel's former PM imprisonment for 8 months | इस्रायलच्या माजी पंतप्रधानांना ८ महिन्यांची कैद

इस्रायलच्या माजी पंतप्रधानांना ८ महिन्यांची कैद

Next

जेरुसलेम : इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमेरिकन समर्थक आणि उद्योजक मोरिस टेलेन्स्कीकडून पैशाने भरलेली पाकिटे स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
ओल्मर्ट जेरुसलेम शहराचे महापौर असताना टेलेन्स्कीने त्यांना सहा लाख डॉलर्स दिले आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्री असतानाही अधिक रक्कम ओल्मर्ट यांनी घेतली असा हा आरोप आहे. यावर्षी मार्च महिन्यामध्ये त्यांच्यावरील आरोप निश्चित करण्यात आले. त्यांना आठ महिन्यांचा कारावास आणि २५ हजार डॉलर्स दंड ठोठावण्यात आला.
एहूद ओल्मर्ट २००६ ते २००९ या कालावधीत इस्रायलचे पंतप्रधान होते. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना पद गमवावे लागले होते. ६९ वर्षीय ओल्मर्ट १९८८ ते १९९२ या कालावधीत कॅबिनेट मंत्री होते. त्यानंतर २००३ पर्यंत ते जेरुसलेमचे महापौर होते आणि त्यानंतर ते अरायल शेरॉन यांच्या मंत्रिमंडळात होते. शेरॉन आजारी पडल्यानंतर काही काळ अंतरिम पंतप्रधानपद ओल्मर्ट यांनी सांभाळले, नंतर ते पंतप्रधान झाले. त्यांनी पद सोडल्यानंतर बिन्यामिन नेत्यानाहू यांचे युग सुरू झाले.

Web Title: Israel's former PM imprisonment for 8 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.