20 दिवसांत गाझा उद्ध्वस्त! अन्न, तेलासाठी लांबच लांब रांगा; मुलांच्या हातावर बांधतात रंगीत धागा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 10:36 AM2023-10-27T10:36:57+5:302023-10-27T10:37:15+5:30

Israel Palestine Conflict : इस्रायलच्या रॉकेट हल्ल्यात गाझामधील शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. रडणारी मुलं, घराची वाईट अवस्था, खाद्यपदार्थ, तेलासाठी लांबच लांब रांगा, रुग्णालयात उपचारासाठी तासनतास वाट पाहणं... हे गाझाचं वास्तव आहे.

israel hamas war gaza changed long lines food oil why people tying colorful threads hands children | 20 दिवसांत गाझा उद्ध्वस्त! अन्न, तेलासाठी लांबच लांब रांगा; मुलांच्या हातावर बांधतात रंगीत धागा

20 दिवसांत गाझा उद्ध्वस्त! अन्न, तेलासाठी लांबच लांब रांगा; मुलांच्या हातावर बांधतात रंगीत धागा

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 20 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या 20 दिवसांत गाझाचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. अनेक इमारतींची पडझड झाली आहे. इस्रायलच्या रॉकेट हल्ल्यात गाझामधील शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. रडणारी मुलं, घराची वाईट अवस्था, खाद्यपदार्थ, तेलासाठी लांबच लांब रांगा, रुग्णालयात उपचारासाठी तासनतास वाट पाहणं... हे गाझाचं वास्तव आहे. मॅक्सर टेक्नॉलॉजीने सॅटेलाइट इमेज जारी केली आहे. यामध्ये गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यापूर्वी आणि नंतरच्या चित्रांची तुलना करण्यात आली आहे. 

सॅटेलाइट फोटो गाझा पट्टीतील अल-कारमेन आणि अटात्रा भागातील आहेत. जे इस्रायलच्या संरक्षण दलाने हवाई हल्ल्यांद्वारे नष्ट केले. गाझामध्ये राहणारे लोक देखील सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत आहेत, ज्यामध्ये इस्रायली हवाई दलाने झालेले नुकसान दाखवले आहे. 7 ऑक्टोबरपासून हमाससोबत युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलचे हवाई दल सातत्याने हल्ले करत आहे. यामध्ये अनेक शस्त्रास्त्रांचे डेपो आणि हमासच्या सुरुंगांचा समावेश आहे, जे नष्ट करण्यात आले आहेत.

11 ऑक्टोबर रोजी, इस्रायली हवाई दलाचे प्रमुख ओमर टीशलर म्हणाले की, त्यांचे सैन्य दिवस आणि रात्र यात कोणताही भेद न करता हमासच्या दहशतवाद्यांवर चोवीस तास हजारो बॉम्ब टाकत आहेत. हवाई हल्ल्यांमुळे गाझामधील अनेक भाग उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र दिसत आहे. जिथे हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे दहशतवादी लपले आहेत. टीशलर म्हणाले की, गाझातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला आणि आत लपलेल्या दहशतवाद्यांनाही लक्ष्य केलं जात आहे.

अन्न, तेलासाठी लांबच लांब रांगा

चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कनुसार, इस्रायलने सोमवारी गाझामधील एका शहरावर बॉम्बफेक केली. आता इथली परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की लोकांना खाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेल मिळावे म्हणून लोक पेट्रोल पंप आणि गॅस स्टेशनवर तासनतास रांगेत उभे आहेत. गॅस आणि रॉकेलच्या कमतरतेमुळे लोकांना चुलीवर अन्न शिजवावे लागत असल्याची परिस्थिती आहे.

युद्धानंतर गाझामध्ये 6500 हून अधिक मृत्यू

गाझा पट्टीतील आरोग्य मंत्रालयाने 25 ऑक्टोबर रोजी सांगितलं, की इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यांमध्ये 6,500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. इस्रायलने गाझा पट्टीवर बॉम्बफेक केली आहे आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासचा नाश करण्याच्या उद्देशाने आक्रमणाची तयारी करत आहे, कारण रशियाने इशारा दिला आहे की हा संघर्ष मध्य पूर्वेपर्यंत पसरू शकतो.

पालक मुलांच्या हातावर बांधतात रंगीत धागा 

गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना मृत्यूची भीती इतकी सतावत आहे की इस्रायल कधी हल्ला करेल आणि सामान्य लोक आणि त्यांचे कुटुंबीय त्याला बळी पडतील हे त्यांना कळत नाही. बॉम्ब पडल्यानंतर मृतदेह नष्ट होतात आणि काही वेळा मृतदेहांची ओळखही होऊ शकत नाही. त्यामुळे गाझातील पालक मुलांच्या हातावर धागे बांधत आहेत. गाझामध्ये राहणाऱ्या पालकांचे म्हणणे आहे की, इस्रायल हल्ले करत आहे. आम्हाला किंवा आमच्या मुलांना काही झाले तर आम्ही धाग्याद्वारे आमच्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह ओळखू शकतो.
 

Web Title: israel hamas war gaza changed long lines food oil why people tying colorful threads hands children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.