म्हणे कॅनडाच्या निवडणुकांत भारताचा हस्तक्षेप; ट्रुडोंनी चौकशी सुरु केली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 10:21 AM2024-01-25T10:21:19+5:302024-01-25T10:21:33+5:30

महत्वाचे म्हणजे याच कॅनडाने २०१९ आणि २०२१ मध्ये चीन आपल्या निवडणुका प्रभावित करत असल्याचा आरोप केला होता.

India's interference in Canadian elections; Trudeau launched an investigation | म्हणे कॅनडाच्या निवडणुकांत भारताचा हस्तक्षेप; ट्रुडोंनी चौकशी सुरु केली

म्हणे कॅनडाच्या निवडणुकांत भारताचा हस्तक्षेप; ट्रुडोंनी चौकशी सुरु केली

भारत आणि कॅनडादरम्यान दहशतवाद्यांवरून सुरु झालेला राजकीय वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीय. कॅनडा वेळोवेळी भारताला लक्ष्य करत सुटला आहे. आता कॅनडाच्या फॉरेन इंटरफेयरन्स कमिशनने भारतावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. भारताने म्हणे तिथल्या निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न केलाचा आरोप या कमिशनने लावला आहे. याची चौकशीही या कमिशनने लावली आहे. 

महत्वाचे म्हणजे याच कॅनडाने २०१९ आणि २०२१ मध्ये चीन आपल्या निवडणुका प्रभावित करत असल्याचा आरोप केला होता. यासाठी या कमिशनची स्थापना केली होती. तिथे भागले नाही म्हणून आता भारतावर नसते आरोप करत सुटला आहे. यामुळे या कमिशनने गेल्या सप्टेंबरमध्ये चौकशी सुरु केली होती. आता भारत सरकारकडे कथितरित्या हस्तक्षेप संबंधीची कागदपत्रे उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. 

खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव आहे. शीख दहशतवादी निज्जरची हत्या झाली होती, ती भारताने केल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला होता. तर भारताने याचे पुरावे मागितले होते. आता वर्ष होत आले तरी कॅनडा काही पुरावे देऊ शकली नाही. या वादात भारताने कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते. हे लोक भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करत होते. 

आता हा कॅनडाचा आयोग 3 मे 2024 पर्यंत अंतरिम अहवाल पूर्ण करणार आहे. बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आयोग 31 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम अहवाल सादर करेल. हा आयोग रशिया आणि इराणच्या कथित सहभागाची चौकशी करत आहे.

निवडणुकांमध्ये जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखालील लिबरल्सची पुन्हा निवड झाली आहे. चीनवर परंपरावाद्यांच्या विरोधात उदारमतवाद्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जगमीत सिंग यांनी निवडणुकांच्या निकालांवर प्रभाव टाकण्यात भारताच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. तसे पत्र त्यांनी ट्रुडो यांना लिहिले होते. 

Web Title: India's interference in Canadian elections; Trudeau launched an investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.