जर्मनीत भारतीय दाम्पत्यावर हल्ला; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 12:09 PM2019-03-31T12:09:10+5:302019-03-31T12:09:17+5:30

जर्मनीमध्ये भारतीय दाम्पत्यावर चाकूहल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Indian couple attacked in Germany; Husband dies, wife seriously injured | जर्मनीत भारतीय दाम्पत्यावर हल्ला; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

जर्मनीत भारतीय दाम्पत्यावर हल्ला; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Next

नवी दिल्ली -  जर्मनीमध्येभारतीय दाम्पत्यावर चाकूहल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जर्मनीतील   म्युनिक येथे एका प्रवाशाने भारतीय दाम्पत्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असून, पत्नी जखमी झाली आहे. या हल्ल्यात प्रशांत बसरूर (49) यांचा मृत्यू झाला आहे, तर त्यांची पत्नी स्मिता (43) या गंभीर जखमी झाल्या आहेत. 

  परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. भारतीय दाम्पत्या प्रशांत आणि स्मिता बसरूर यांच्यावर म्युनिक येथे एका प्रवाशाने चाकू हल्ला केला. दुर्दैवाने या हल्ल्यात प्रशांत यांचा मृत्यू झाला. तर स्मिता या गंभीर जखमी झाल्या. स्मिता यांची प्रकृती आता स्थिर आहे. आम्ही प्रशांत यांच्या भावाला जर्मनीत पाठवण्याची व्यवस्था करत आहोत. अशा दुखाच्या प्रसंगी आमची संवेदना बसरूर कुटुंबीयांसोबत आहे. 




 भारतीय दाम्पत्यावर हल्ला करणारा 33 वर्षीय हल्लेखोर हा न्यू गिनी येथील रहिवासी आहे. त्याला अटक करण्यात आली असून, त्याने हल्ल्यासाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. मात्र त्याने भारतीय दाम्पत्यावर का हल्ला केला. याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 




प्रशांत बसरूर हे मुळचे भारतातील कर्नाटक राज्यातील उडुपी येथील होते. 15 वर्षांपूर्वी बसरूर दाम्पत्या जर्मनी येथे गेले होते. तसेच त्यांना गेल्यावर्षी जर्मनीचे नागरिकत्व मिळाले होते. त्याआधी त्यांनी बंगळुरू आणि हैदराबाद येथेही काही काळ वास्तव्य केले होते.  

Web Title: Indian couple attacked in Germany; Husband dies, wife seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.