मुंबई- पुणेकर दुबईतही अव्वल, सर्वाधिक गुंतवणुकीत भारत प्रथम क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 03:33 PM2017-10-27T15:33:42+5:302017-10-27T16:36:23+5:30

दुबई हे पर्यटन क्षेत्रातलं एक प्रमुख केंद्र बनलं आहे. पर्यटनाबरोबरच ते शॉपिंगसाठीही प्रसिद्ध आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत दुबईच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या भरपूर वाढली आहे...

India ranked first in the top, highest investment in Dubai, Pune and Dubai | मुंबई- पुणेकर दुबईतही अव्वल, सर्वाधिक गुंतवणुकीत भारत प्रथम क्रमांकावर

मुंबई- पुणेकर दुबईतही अव्वल, सर्वाधिक गुंतवणुकीत भारत प्रथम क्रमांकावर

Next
ठळक मुद्देभारत आणि आखाती देशांमध्ये फार अंतर नाही. दुबईला जाणाऱ्यांमध्ये भारतीयांची संख्या बरीच आहे. केवळ शॉपिंगसाठी दुबईला जाणाऱ्या भारतीयांची संख्या वाढत आहे. परदेशात कुठेही प्रॉपर्टी घेणं हे तसं खर्चिक असतं. पण दुबईत प्रॉपर्टी घेणं भारतीयांना अजिबात खर्चिक वाटत नाही. दुबई फार खर्चिक वाटणं तर सोडाच पण मुंबईपेक्षाही ती स्वस्त वाटते.

नवी दिल्ली - दुबईतला बुर्ज खलिफा हा जगातला सर्वात उंच टॉवर. बुर्ज खलिफाची उंची तब्बल 829 मीटर एवढी आहे. पण केवळ बुर्ज खलिफामुळेच नव्हे तर रियल इस्टेट इण्डस्ट्रीत होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीमुळेही दुबईचं महत्त्व वाढलं आहे. जगातल्या अनेक गुंतवणुकदारांनी आपला मोर्चा दुबईकडे वळवला आहे. यामध्ये भारतीय आघाडीवर असल्याचे समोर आलं आहे.

दुबई हे एक स्वच्छ आणि सुंदर शहर आहे. नियोजनबद्ध पद्धतीने वसलेलं आणि विकसित झालेलं. अशा शहरात जायला, फिरायला आणि राहायला कुणाला नाही आवडणार? म्हणूनच दुबई हे पर्यटन क्षेत्रातलं एक प्रमुख केंद्र बनलं आहे. पर्यटनाबरोबरच ते शॉपिंगसाठीही प्रसिद्ध आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत दुबईच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या भरपूर वाढली आहे आणि त्यात भारतीय गुंतवणुकदारांचं प्रमाण सर्वाधिक आहे.

एकीकडे नोटाबंदी आणि जीएसटीमुळे भारतीयांचं गुंतवणुकीचं प्रमाण कमी झाल्याचं सांगण्यात येत असताना दुबईतून ही नवी आकडेवारी समोर आली आहे. दुबईत सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश म्हणून भारत पहिल्या क्रमांकावर आहे. महत्त्वाचं म्हणजे भारतातील मुंबई, नवी मुंबई, पुणे या शहरांतील नागरिकांनी गुंतवणुकीसाठी दुबईला पसंती दिल्याचं समोर आलं आहे.

गेल्या दीड वर्षामध्ये भारतीयांनी सुमारे 22 हजार कोटी रुपयांची संपत्ती खरेदी केली आहे. दुबईच्या लँड डिपार्टमेंटने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, दुबईत गुंतवणूक करणारे भारतीय परदेशी जास्त आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 2014 पर्यंत यात 12 हजार कोटींची वाढ झाली आहे. भारतीय दरवर्षी दुबईत 30 हजार कोटी रुपये प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी गुंतवतात. दुबईतील एकूण विक्री सुमारे एक लाख कोटी रुपये आहे. दुबई प्रॉपर्टी शोने जारी केलेल्या एका निवेदनानुसार, जानेवारी 2016 ते जून 2017 दरम्यान भारतीय लोकांनी 42 हजार कोटी रुपयांची संपत्ती खरेदी केली आहे. 33 टक्के भारतीयांनी अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी गुंतवणूक केली आहे. व्हीलामध्ये 17 टक्के, व्यापारी मालमत्तेसाठी 9 टक्के, जमिनीत 6 टक्के आणि 35 टक्के इतर जागी गुंतवणूक केली आहे.

दुबईतल्याच 'रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेण्ट प्रमोशन अ‍ॅण्ड मॅनेजमेण्ट सेण्टर'च्या मतानुसार भारतीय गुंतवणुकदारांनी दुबईत एकूण २,१५३ प्रॉपर्टीज घेतल्या आहेत. त्यांचं एकूण मूल्य ५६७० कोटी रुपये आहे. भारतापाठोपाठ पाकिस्तानी गुंतवणुकदारांचा क्रमांक लागतो. ४४०० कोटींच्या १८१४ प्रॉपर्टीजमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी गुंतवणूक केली आहे. ब्रिटनच्या नागरिकांचा ओढाही दुबईकडे आहे. याशिवाय अन्य ठिकाणच्या गुंतवणुकदारांनीही या शहरात प्रॉपर्टीज खरेदी केल्या आहेत. दुबईतल्या रियल इस्टेट क्षेत्रात झालेल्या प्रत्यक्ष परदेशी गुंतवणुकीने ३३,३०० कोटींचा टप्पा गाठला आहे. ही गुंतवणूक २०१२ च्या प्रथम सहामाहीत झालेली आहे. त्यात प्लॉट, फ्लॅट, रो हाऊसेस आणि व्हिला स्वरूपातल्या १२,८७५ प्रॉपर्टीजचा समावेश आहे.

Web Title: India ranked first in the top, highest investment in Dubai, Pune and Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.