इम्रान खान यांना मोठ्ठा धक्का! पाकिस्तानची आगामी निवडणूक लढवण्यास न्यायालयाने ठरवलं अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 12:29 AM2023-12-22T00:29:39+5:302023-12-22T00:31:14+5:30

८ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे

Imran Khan appeal against conviction rejected in toshkhana corruption scam by Pakistan court says lawyer says | इम्रान खान यांना मोठ्ठा धक्का! पाकिस्तानची आगामी निवडणूक लढवण्यास न्यायालयाने ठरवलं अपात्र

इम्रान खान यांना मोठ्ठा धक्का! पाकिस्तानची आगामी निवडणूक लढवण्यास न्यायालयाने ठरवलं अपात्र

Pakistan Elections Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नुकताच मोठा धक्का बसला. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अपात्रता रद्द करण्याचे अपील फेटाळून लावले. यामुळे ते 8 फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक लढवू शकणार नाहीत. न्यायालयाच्या या आदेशानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान निवडणूक लढवण्यास अपात्र ठरले आहेत. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. त्यांच्या वकिलाने ट्विटरवर एका पोस्टमध्ये याबद्दल सांगितले.

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने पाकिस्तान मधील तुरुंगात असलेले इम्रान खान किमान तीन मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. ७१ वर्षीय माजी क्रिकेटपटू-राजकारणी इम्रान यांना इस्लामाबाद न्यायालयाने या वर्षी ऑगस्टमध्ये तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवले होते. याचा अर्थ त्यांना पाच वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र घोषित करण्यात आले होते. मात्र, नंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांची तीन वर्षांची शिक्षा स्थगित केली.

असे असले तरी इम्रान खान अजूनही इतर प्रकरणांमध्ये तुरुंगात आहेत. पण आता इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांची अपात्रता रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. दुसरीकडे, पीटीआय उमेदवारी अर्जांबाबत उमेदवारांवर आपली पकड घट्ट करत आहे. माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या सचिवांकडून केवळ नामनिर्देशनपत्रच हिसकावण्यात आले नाही, तर त्यांचे प्रतिज्ञापत्र, टॅक्स रिटर्न, एनओसी यासह सर्व कागदपत्रेही हिसकावण्यात आल्याचा दावा पीटीआयच्या अध्यक्ष गौहर खान यांनी केला आहे.

Web Title: Imran Khan appeal against conviction rejected in toshkhana corruption scam by Pakistan court says lawyer says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.