ब्रिटनमधील दहशतवादी हल्ल्यानंतर गुरुद्वाराकडून मदतीचा हात

By admin | Published: May 23, 2017 10:08 AM2017-05-23T10:08:14+5:302017-05-23T10:08:52+5:30

मॅन्चेस्टर येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पीडित आणि गरजूंच्या मदतीसाठी गुरुद्वाराने पुढाकार घेतला आहे.

Gurdwara's hand helped after a terrorist attack in Britain | ब्रिटनमधील दहशतवादी हल्ल्यानंतर गुरुद्वाराकडून मदतीचा हात

ब्रिटनमधील दहशतवादी हल्ल्यानंतर गुरुद्वाराकडून मदतीचा हात

Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 23 - मॅन्चेस्टर येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पीडित आणि गरजूंच्या मदतीसाठी गुरुद्वाराने पुढाकार घेतला आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना तसंच मदतीसाठी धावाधाव करत असलेल्यांना गुरुद्वाराने आसरा दिला आहे. हरजिंदर सिंग यांनी ट्विट करत परिसरातील चार गुरुद्वारांचा पत्ता दिला आहे. जेणेकरुन त्यांचा शोध घेणं सोपं जाईल. हरजिंदर सिंग यांनी ट्विट करत, गुरुद्वारा सर्वांसाठी खुला असून जेवण आणि राहण्याची सोय केली असल्याची माहिती दिली आहे. यासोबतच परिसरातील नागरिकांनीही ट्विटरच्या माध्यमातून मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. 
 
ब्रिटनच्या मॅन्चेस्टरमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. प्रसिद्ध गायिका अरियाना ग्रॅण्ड यांचं कॉन्सर्ट सुरु असतानाच हा दहशतवादी हल्ला करण्यात आला. मॅन्चेस्टरमधील एरिना सभागृहात हे कॉन्सर्ट सुरु होतं. कॉन्सर्ट संपायला आलं असतानाच हे भीषण स्फोट झाले. या भीषण स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 
 
मॅन्चेस्टर एरिना हे इंग्लंडमधील सर्वात मोठं सभागृह आहे. याला ब्रिटिश एरिना असंही म्हणलं जातं. या सभागृहाची आसन क्षमता 21 हजार असून, 2002 मधील कॉमनवेल्थ खेळात या सभागृहाचा वापर करण्यात आला होता.
 
आत्मघाती हल्लेखोराने हा स्फोट घडवून आणल्याची शक्यता आहे. घटनास्थळी स्फोट झाला त्याठिकाणी एका व्यक्तीचा मृतेदह आढळून आला असून तो आत्मघाती हल्लेखोर असण्याची शक्यता आहे. याआधी 7 जुलै 2005 रोजी अशाप्रकारचा भीषण दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामधअये 52 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 700 हून अधिकजण जखमी झाले होते.
 
घटनेनंतर ग्रॅण्ड मॅन्चेस्टर पोलिसांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यास सुरुवात केली आहे. तसंच तपासही सुरु केला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 

Web Title: Gurdwara's hand helped after a terrorist attack in Britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.