जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफाजवळील इमारतीला आग

By Admin | Published: April 2, 2017 03:22 PM2017-04-02T15:22:54+5:302017-04-02T15:22:54+5:30

दुबईमधील जगातील सर्वात उंच इमारत अशी ओळख असलेल्या बुर्ज खलिफाजवळील एका इमारतीला भीषण आग

Fire in the world's tallest turret khilifera building | जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफाजवळील इमारतीला आग

जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफाजवळील इमारतीला आग

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 2 - दुबईमधील जगातील सर्वात उंच इमारत अशी ओळख असलेल्या बुर्ज खलिफाजवळील एका इमारतीला भीषण आग लागली.  आग लागलेल्या इमारतीचं बांधकाम सुरू असतानाच ही घटना घडली. आगीमुळे धूराचे मोठे लोट परिसरात पसरले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 6.30 वाजता (भारतीय वेळ) ही आग लागली.  घटनास्थळी अग्नीशमन दलाचे पथक दाखल झाले आणि त्यांना आगीवर ताबा मिळवण्यात यश आलं. आग लागण्याचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.  आग लागली ती इमारत इमार प्रॉपर्टीजची आहे. आगीमुळे संपूर्ण परिसरात धूराचे लोट दिसून आले. 
 
दुबईतील इमारतींना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. इमारतींमध्ये वापरण्यात येणा-या कोटिंग पदार्थांमुळे आग लागण्याच्या घटना वाढत असल्याचं बोललं जात आहे. 
 

Web Title: Fire in the world's tallest turret khilifera building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.