फुटबॉल विश्वचषक ट्रॉफीमधून अमली पदार्थांची तस्करी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 04:01 PM2018-06-26T16:01:37+5:302018-06-26T16:05:54+5:30

अर्जेंटिना पोलिसांच्या शोधमोहिमेमध्ये या प्रतिकृतींमध्ये गांजा आणि कोकेन भरल्याचे लक्षात आले.

FIFA World Cup 2018: Replicas of World Cup trophy used for drug trafficking, confiscated in Buenos Aires | फुटबॉल विश्वचषक ट्रॉफीमधून अमली पदार्थांची तस्करी 

फुटबॉल विश्वचषक ट्रॉफीमधून अमली पदार्थांची तस्करी 

Next

ब्युनॉस आयर्स- रशियात सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकाने जगभरातील फुटबॉलप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. फुटबॉल संदर्भातील कपडे, वस्तू, खेळणी, फुगे यांची विक्री व वापरही या काळामध्ये वाढतो. पण अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस आयर्समध्ये मात्र फुटबॉल विश्वचषकाच्या काळात अंमली पदार्थांच्या तस्करांनीही नवी शक्कल लढवल्याचे स्पष्ट झाले आहे. या तस्करांनी विश्वचषकाच्या प्रतिकृतींमधून अंमली पदार्थांची ने-आण आणि विक्री सुरु केली आहे.

अर्जेंटिना पोलिसांच्या शोधमोहिमेमध्ये या प्रतिकृतींमध्ये गांजा आणि कोकेन भरल्याचे लक्षात आले. विश्वचषकाच्या प्रतिकृतींबरोबर तस्करांच्या एका टोळीला अटक करण्यात आली आहे. ग्रेटर ब्युनॉस आयर्समधील ल मतान्झा पार्तिदो येथे टाकलेल्या छाप्यात सहा लोकांना अटक करण्यात आलेली आहे.

छापा चाकलेल्या स्थळावर 1.5 किलो गांजा व कोकेन जप्त करण्यात आले. फुटबॉलची लोकप्रियता विश्वचषकाच्या काळामध्ये एकदम वाढलेली असते. त्याचा वापर करुन विश्वचषकांच्या प्रतिकृतींधून गांजा, कोकेन विकण्याचे काम हे लोक करत होते.
या लोकांना अटक करुन तुरुंगात टाकणं गरजेचच आहे. ते पुन्हा या व्यवसायात येता कामा नयेत असे मत ब्युनॉस आयर्सचे सिक्युरिटी मिनिस्टर क्रिस्तीयन रितोंदो यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
 

Web Title: FIFA World Cup 2018: Replicas of World Cup trophy used for drug trafficking, confiscated in Buenos Aires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.