डोनाल्ड ट्रम्प यांची वडिलांना टॅक्स चोरीमध्ये मदत; बदल्यात 41 कोटी डॉलर मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 02:58 PM2018-10-03T14:58:02+5:302018-10-03T14:59:18+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आज आणखी एका वादात सापडले आहेत. डोनाल्ड यांनी त्यांचे वडील फ्रेड ट्रम्प यांना करचोरी साठी मदत केली होती.

Donald Trump's helped to father for tax evasion; In exchange, $ 41 million was received | डोनाल्ड ट्रम्प यांची वडिलांना टॅक्स चोरीमध्ये मदत; बदल्यात 41 कोटी डॉलर मिळाले

डोनाल्ड ट्रम्प यांची वडिलांना टॅक्स चोरीमध्ये मदत; बदल्यात 41 कोटी डॉलर मिळाले

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आज आणखी एका वादात सापडले आहेत. डोनाल्ड यांनी त्यांचे वडील फ्रेड ट्रम्प यांना करचोरी साठी मदत केली होती. याबदल्यात त्यांना तब्बल 41 कोटी डॉलरची संपत्ती मिळाली होती. याबाबतचा खुलासा अमेरिकेतील एका आघाडीच्या वृत्तपत्राने केला आहे. 


‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने मंगवारी एक अहवाल छापला आहे. यामध्ये हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. ट्रम्प हे स्वत:ला स्वकर्तुत्वावर अब्जाधीश झाल्याचे सांगतात. ते म्हणतात की, फ्रेड ट्रम्प यांच्याकडून केवळ 10 अबेज डॉलर कर्ज घेतले होते. त्यातून त्यांनी उद्योगविश्व उभे केले. मात्र, खरी गोष्ट वेगळीच आहे. 


न्यूयॉर्क टाईम्सने एक लाख कागदपत्रे आणि ट्रम्प यांच्या कुटुंबाशी जोडले गेलेल्या लोकांच्या हवाल्याने टॅक्स चोरीचा खुलासा केला आहे. मात्र, ट्रम्प यांच्या वकिलांनी ही बाब खोटी असल्याचे म्हटले आहे. या अहवालानंतर अमेरिकी कर खात्याने चौकशी सुरु केली आहे. 
90 च्या दशकात ट्रम्प यांची आई आणि वडील फ्रेड यांनी 7300 कोटी रुपयांची संपत्ती मुलांना भेट केली होती. यावर 4015 कोटींचा कर भरावा लागणार होता. ट्रम्प आणि त्यांच्या भावंडांनी खोटी माहीती देऊन हा कर केवळ 403 कोटी रुपये केला होता. यामुळे त्यांना 55 टक्क्यांऐवजी 5 टक्केच कर द्यावा लागला होता. अशा प्रकारे त्यांनी 3600 कोटी रुपयांचा कर चोरी केली होती. 

यासाठी ट्रम्प यांनी एक बोगस कंपनी ऑल काऊंटी बिल्डिंग सप्लाई अँड मेन्टेनन्स बनविली. ही कंपनी केवळ कागदावरच होती. कंपनीच्या रेकॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणावर बिल्डिंग मटेरिअल करेदीचे आकडे दाखविण्यात आले. या आकड्यांच्या आडून ट्रम्प आणि त्यांच्या भावंडांना फ्रेड यांच्याकडून पैसे पाठविले जात होते. 


तर दुसऱ्या प्रकारात फ्रेड आणि त्यांच्या पत्नीने एक ट्रस्ट स्थापन केली होती. ही ट्रस्ट 55 टक्क्यांचा कर वाचवून संपत्ती मुलांच्या नावे करण्यासाठीच बनविण्यात आली होती. 

Web Title: Donald Trump's helped to father for tax evasion; In exchange, $ 41 million was received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.