Trump-Putin summit: डोनाल्ड ट्रम्प-पुतिन बैठकीत वादमुद्द्याला बगल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 03:25 AM2018-07-17T03:25:41+5:302018-07-17T03:26:18+5:30

हेलसिंकी या फिनलँडच्या राजधानीत अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची शिखर बैठक सोमवारी सायंकाळी सुरु झाली.

 Donald Trump-Putin adjourned the proceedings | Trump-Putin summit: डोनाल्ड ट्रम्प-पुतिन बैठकीत वादमुद्द्याला बगल

Trump-Putin summit: डोनाल्ड ट्रम्प-पुतिन बैठकीत वादमुद्द्याला बगल

Next

हेलसिंकी : हेलसिंकी या फिनलँडच्या राजधानीत अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची शिखर बैठक सोमवारी सायंकाळी सुरु झाली. सुरुवातीस हे दोन्ही नेते फक्त दुभाषे सोबत घेऊन भेटले. नंतर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा व्हायची होती. परंतु हे वृत्त देईपर्यंत बैठक संपली नव्हती.
गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने ट्रम्प यांच्या यशासाठी केलेल्या कथित ‘लुडबुडी’ची सध्या चौकशी सुरु आहे. ट्रम्प याविषयी पुतिन यांना थेट जाब विचारतील, अशी अपेक्षा होती. मात्र दोन्ही नेत्यांनी बैठकीला जाण्यापूर्वी जी प्राथमिक निवेदने केली त्यावरून हा वादाचा मुद्दा अ‍ॅजेंड्यावर नसल्याचे स्पष्ट झाले.
आम्ही समोरासमोर बसून बऱ्याच विषयांवर रोखठोक चर्चा करणे गरजेचे होते. तशी आज आम्ही करू, असे दोन्ही नेत्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
>हेलसिंकी या फिनलँंडच्या राजधानीतील अध्यक्षीय प्रासादात सोमवारी शिखर बैठकीच्या आधी हस्तांदोलन करताना अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन.

Web Title:  Donald Trump-Putin adjourned the proceedings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.