मुलीचा मृत्यू, वर्षानुवर्षे आई-वडील मृतदेहासोबत राहिले; विचित्र घटनेनं सर्वत्र खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 01:50 PM2024-02-11T13:50:15+5:302024-02-11T13:52:32+5:30

आई-वडिलांनी अंत्यसंस्कार न करता आपल्या मुलीचा मृतदेह तसाच सडून दिला.

Daughter dies parents stay with dead body for years A strange incident | मुलीचा मृत्यू, वर्षानुवर्षे आई-वडील मृतदेहासोबत राहिले; विचित्र घटनेनं सर्वत्र खळबळ

मुलीचा मृत्यू, वर्षानुवर्षे आई-वडील मृतदेहासोबत राहिले; विचित्र घटनेनं सर्वत्र खळबळ

सोफ्यावर झोपून असलेल्या महिलेचा तिथेच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह अक्षरश: सडून गेला. मात्र तरीही तिच्या आई-वडिलांनी अंत्यसंस्कार न करता आपल्या मुलीचा मृतदेह तसाच सडून दिला. ही घटना उघडकीस आल्यानंतर आई-वडिलांना २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. तसंच मुलीच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्याविरोधात सध्या खटला सुरू आहे. मात्र नुकत्याच झालेल्या सुनावणीत त्यांनी कोणताही प्रतिवाद करणं टाळलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील लुसियाना येथील एका घरात सापडलेला मृतदेह ३६ वर्षीय लेसी फ्लेचर या महिलेचा होता. हा मृतदेह सोफ्यावरच सडून गेला होता. तिथं मल-मुत्रही आढळून आलं आहे. या महिलेच्या मृत्यू प्रकरणी तिचे वडील क्ले फ्लेचर आणि आई शीला फ्लेचर यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांनी हत्येच्या आरोपाविरोधात कोणतंही अपील न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मृतदेहाची स्थिती पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का

घरात महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान डॉक्टरांना घटनास्थळी नेलं होतं. त्यानंतर तेथील स्थिती पाहून एवेल बिखम हे डॉक्टरही हादरून गेले. मी माझ्या करियरमध्ये बघितलेला हा सर्वाधिक धक्कादायक प्रकार होता, असं डॉक्टर बेखम म्हणाले. ते म्हणाले की, "मी आतापर्यंत आयुष्यात वेगवेगळ्या कारणांतून झालेले मृत्यू बघितले होते. मात्र या प्रकारची हत्या अजूनही बघितली नाही. लेसीचा मृतदेह सोफ्यावरच सडला आणि हळूहळू गायब होत राहिला. तिथं भयंकर दर्प सुटला होता."

दरम्यान, लेसीचा खून तिच्या आई-वडिलांनी केल्याचा आरोप आहे. ती सामान्य मुलांसारखीच होती, मात्र १५ वर्षांपूर्वी ती अचानक गायब झाली, असं तिच्या शेजाऱ्यांनी सांगितलं आहे. 

Web Title: Daughter dies parents stay with dead body for years A strange incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.