प्रगती : मंगळावर केली ऑक्सिजनची निर्मिती; अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चा यशस्वी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 07:10 AM2022-09-04T07:10:41+5:302022-09-04T07:11:11+5:30

‘नासा’ने ‘मॉक्सी १८’ला गेल्यावर्षी पर्सिव्हरन्स रोव्हरसोबत मंगळावर पाठविले होते. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यापासून ‘मॉक्सी १८’ मंगळावर कार्बनडायऑक्साईडचे खूप प्रमाण असलेल्या वातावरणात ऑक्सिजनची निर्मिती करत आहे.

Creation of oxygen on Mars A successful experiment by the American space research agency NASA | प्रगती : मंगळावर केली ऑक्सिजनची निर्मिती; अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चा यशस्वी प्रयोग

प्रगती : मंगळावर केली ऑक्सिजनची निर्मिती; अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चा यशस्वी प्रयोग

googlenewsNext


वॉशिंग्टन : मंगळावर जीवसृष्टी आहे का? याचा शोध जगभरातील शास्त्रज्ञ विविध मोहिमांद्वारे घेत आहेत. मात्र, नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने मंगळावरील मोहिमेत एक मोठे यश मिळवले आहे. मंगळावर ‘नासा’ने टोस्टरच्या आकाराच्या पाठविलेल्या ‘मॉक्सी १८’ या उपकरणाने ऑक्सिजनची निर्मिती केली आहे. त्याचे प्रमाण एक छोटे झाड अठरा महिन्यांत जितक्या ऑक्सिजनची निर्मिती करते तेवढे आहे.
स्टडी सायन्स ॲडव्हान्स जर्नलमध्ये या संशोधनावर आधारित एक लेख प्रसिद्ध झाला आहे. टोस्टरच्या आकाराच्या या उपकरणाचे पूर्ण नाव ‘मार्स ऑक्सिजन इन-सितू रिसोर्स युटिलायझेशन एक्सपेरिमेंट’ (मॉक्सी) असे आहे.

अशा रीतीने ‘मॉक्सी १८’ करते कार्य
मंगळावरील वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण ९६ टक्के आहे. या वायूला ‘मॉक्सी १८’ एका फ्युएल सेलमधून व ७९८.९ अंश सेल्सियस तापमानातून प्रवाहित करते. त्यानंतर विद्युत प्रवाहाच्या मदतीने कार्बन मोनॉक्साईड व ऑक्सिजनच्या अणुंना वेगळे करण्यात येते.

‘नासा’ने ‘मॉक्सी १८’ला गेल्यावर्षी पर्सिव्हरन्स रोव्हरसोबत मंगळावर पाठविले होते. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यापासून ‘मॉक्सी १८’ मंगळावर कार्बनडायऑक्साईडचे खूप प्रमाण असलेल्या वातावरणात ऑक्सिजनची निर्मिती करत आहे.

- मॉक्सी १८ हे उपकरण ऑक्सिजनचे अणू एकत्रित करून त्या वायूची निर्मिती करते.
- पर्सिव्हरन्स रोव्हर उपकरणाद्वारे मंगळावर आतापर्यंत सात प्रयोग करण्यात आले आहेत.

कोणत्याही वातावरणात ‘मॉक्सी १८’ राहते सक्रिय
संशोधकांनी सांगितले की, ‘मॉक्सी १८’ कोणत्याही प्रकारच्या वातावरणात अहोरात्र ऑक्सिजनची निर्मिती करू शकते. या उपकरणाद्वारे मंगळावर आतापर्यंत सात प्रयोग करण्यात आले. त्यात प्रत्येकवेळी ‘मॉक्सी १८’ने ताशी सरासरी सहा ग्रॅम ऑक्सिजनची निर्मिती केली. एक छोटे झाड पृथ्वीवर इतक्या ऑक्सिजनची निर्मिती करते. एका प्रयोगात ‘मॉक्सी १८’ने ताशी १०.४ ग्रॅम ऑक्सिजन तयार केला होता. ‘मॉक्सी १८’चे आणखी मोठ्या आकाराचे उपकरण बनविण्याचा विचार ‘नासा’ने सुरू केला आहे.

 

Web Title: Creation of oxygen on Mars A successful experiment by the American space research agency NASA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.