सौरमालेत दिसला सिगार आकाराचा लघुग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 04:28 AM2017-11-23T04:28:02+5:302017-11-23T04:28:18+5:30

वॉशिंग्टन : आमच्या सौर मालेतून गेल्या आॅक्टोबरच्या मध्यात इंटरस्टेलार अ‍ॅस्टेरॉईड (लघुग्रह) जाताना पहिल्यांदा आढळला.

Cigar shaped asteroid that appears in the solar system | सौरमालेत दिसला सिगार आकाराचा लघुग्रह

सौरमालेत दिसला सिगार आकाराचा लघुग्रह

googlenewsNext

वॉशिंग्टन : आमच्या सौर मालेतून गेल्या आॅक्टोबरच्या मध्यात इंटरस्टेलार अ‍ॅस्टेरॉईड (लघुग्रह) जाताना पहिल्यांदा आढळला. तो सिगारच्या आकाराचा असून तशा प्रकारचे लघुग्रह आमच्या सौरमालेत दिसणे हे खूपच अनपेक्षित आहे, असे नव्या संशोधनात म्हटले आहे. हा लघुग्रह म्हणजे आॅडबॉल आहे, असे हवाईतील खगोलशास्त्र विद्यापीठातील कॅरेन मीच यांनी म्हटले. आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाचे ते प्रमुख आहेत. या लघुग्रहाचे नामकरण ‘ओऊमुआमुअ’ असे अभ्यासकांनी केले आहे. हा लघुग्रह ४०० मीटर लांब आणि तो जेवढा रूंद आहे त्याच्या दहा पट विस्तारलेला आहे, असे ‘जर्नल नेचर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात म्हटले आहे. आमच्या सौरमालेमध्ये आतापर्यंत जे लघुग्रह किंवा धुमकेतुंचे निरीक्षण करण्यात आले त्यांच्यापेक्षा हा मोठा आहे. या लघुग्रहाचा वाढलेला आकारही आश्चर्यकारक आहे व आमच्या सौरमालेत जे लघुग्रह पाहण्यात आले त्यांच्यासारखाही तो नाही. या घडामोडी इतर सौरमाला कशा अस्तित्वात आल्या याबद्दल नवे धागेदोरे असावेत, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. हा आता आमच्या सौरमालेत दृष्टीस पडलेला परंतु नेहमी न दिसणारा व ग्रह कोणत्याही तारकामालेशी जोडला न गेलेला आकाशगंगेत शेकडो दशलक्ष वर्षे भटकत असावा, असा निष्कर्ष निघतो.

Web Title: Cigar shaped asteroid that appears in the solar system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.