रोहिंग्याच्या पुनर्वसनासाठी चीनने तयार केला आराखडा, तीन टप्प्यांमध्ये पुनर्वसन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 01:15 PM2017-11-20T13:15:41+5:302017-11-20T13:22:25+5:30

म्यानमारच्या राखिन प्रांतातून बांगलादेशात आलेल्या 6 लाख रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी  तीन टप्प्यांमध्ये आराखडा सुचवला आहे. राखिनमध्ये शस्त्रसंधी करणे सर्वात जास्त फायदेशीर ठरेल असे तीनने मत मांडले आहे

China's plan for rehabilitation of Rohingyas | रोहिंग्याच्या पुनर्वसनासाठी चीनने तयार केला आराखडा, तीन टप्प्यांमध्ये पुनर्वसन

रोहिंग्याच्या पुनर्वसनासाठी चीनने तयार केला आराखडा, तीन टप्प्यांमध्ये पुनर्वसन

Next
ठळक मुद्देचीनने म्यानमार सरकार आणि लष्कराच्या भूमिकेचे नेहमीच समर्थन केले आहेबांगलादेश आणि म्यानमारने रोहिंग्या प्रश्नावर गेल्या महिन्यापासून चर्चा सुरु केली आहे.

बीजिंग- म्यानमारच्या राखिन प्रांतातून बांगलादेशात आलेल्या 6 लाख रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी  तीन टप्प्यांमध्ये आराखडा सुचवला आहे. राखिनमध्ये शस्त्रसंधी करणे सर्वात जास्त फायदेशीर ठरेल असे तीनने मत मांडले आहे.

आशिया युरोप मीटिंग (एएसइएम) त्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक म्यानमारमध्ये होत आहे. म्यानमार आणि बांगालादेश रोहिंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा करून प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा असून राखिनमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शस्त्रसंधी केल्यास तेथे शांतता प्रस्थापित होईल आणि रोहिंग्यांना परत जाण्यासाठी योग्य वातावरण तयार होईल असे मत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केले आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी देखिल बैठकीसाठी म्यानमारमध्ये दाखल झाले आहेत. 

25 ऑगस्ट रोजी दहशतवादी गटांनी पोलीसांच्या चौक्यांवर हल्ला केल्यानंतर लष्कराने फुटीरतावादी दहशतवाद्यांवर प्रतिहल्ला चढवला आणि संपुर्ण राखिन प्रांत यामध्ये ढवळून निघाला. त्यामुळे रोहिंग्या म्यानमार सोडून बांगलादेशकडे जाऊ लागले. अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीने 10 सप्टेंबर रोजी एका महिन्यासाठी शस्त्रसंधी जाहीक केली त्यानंतर सरकारतर्फेही शस्त्रसंधी जाहीर केली गेली.




चीनने म्यानमार सरकार आणि लष्कराच्या भूमिकेचे नेहमीच समर्थन केले आहे. आता बांगलादेश आणि म्यानमारने रोहिंग्या प्रश्नावर गेल्या महिन्यापासून चर्चा सुरु केली आहे. आशिया युरोप मीटिंगच्या बैठकीसठी आलेल्या जर्मनी आणि स्वीडनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ढाक्यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांची भेट घेऊन रोहिंग्यांच्या प्रश्नावर बांगलादेशच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे युरोपियन युनियनच्या सदस्यांनीही त्यांना पाठिंबा दिला. अमेरिकन संसद सदस्यांच्या शिष्टमंडळानेही बांगलादेशात परिस्थितीची पाहाणी करुन वाजेद यांची भेट घेतली

Web Title: China's plan for rehabilitation of Rohingyas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.