चीनने पृथ्वीच्या पोटात उभारली प्रयोगशाळा; इतक्या खोल ड्रॅगन नेमकं काय शोधतोय? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 02:51 PM2023-12-08T14:51:16+5:302023-12-08T14:51:55+5:30

चीनने दक्षिण-पश्चिम सिचुआन राज्यात जगातील सर्वात खोल प्रयोगशाळा उभारली आहे.

china-setsup-world-deepest-lab-jinping-know-what-special-in-this-lab | चीनने पृथ्वीच्या पोटात उभारली प्रयोगशाळा; इतक्या खोल ड्रॅगन नेमकं काय शोधतोय? पाहा...

चीनने पृथ्वीच्या पोटात उभारली प्रयोगशाळा; इतक्या खोल ड्रॅगन नेमकं काय शोधतोय? पाहा...

बीजिंग: चीनने जगातील सर्वात खोल आणि सर्वात मोठी भूमिगत प्रयोगशाळा तयार केल्याची माहिती समोर आली आहे. चिनी वैज्ञानिकांनी या प्रयोगशाळेत कामही सुरू केलंय. चीनच्या दक्षिण-पश्चिम सिचुआन प्रांतात 2400 मीटर खोल ही प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत नेमकं काय सुरू आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. पण, दावा करण्यात येतोय की, या प्रयोगशाळेत अनेक रहस्ये उघड होणार आहेत.

विशेष म्हमजे, चीनची चंद्रावर नजर आहे. रशिया आणि चीनने चंद्रावर आपला बेस बांधण्याबाबत वक्तव्ये केली आहेत. अशा परिस्थितीत चीनला एवढी खोल लॅब बांधण्याची गरज का पडली आणि या भूमिगत प्रयोगशाळेत कोणते काम सुरू आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

काय आहे डार्क मॅटर?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भूमिगत लॅबमध्ये अल्ट्रा लो रेडिएशन बॅकग्राउंडची सुविधा आहे. चिनी शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, बऱ्याच काळापासून 'डार्क मॅटर' एक रहस्य राहिले आहे. त्याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. या नवीन प्रयोगशाळेमुळे डार्क मॅटरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होईल. या प्रयोगशाळेला जिनपिंग लॅब असे नाव देण्यात आले आहे. डार्क मॅटर असा पदार्थ आहे, ज्यात कोणतीही ऊर्जा किंवा प्रकाश नसतो. त्यामुळे हा शोधणे कठीण आहे. चिनी शास्त्रज्ञांना यासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे शोधून इतिहास रचायचा आहे. 

पृथ्वीच्या खोलात उत्तरे कशी मिळतील?
चीनमधील या भूमिगत प्रयोगशाळेच्या पहिल्या टप्प्याचे काम 2010 मध्ये पूर्ण झाले होते, परंतु आता ते पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आले आहे. अशा स्थितीत डार्क मॅटरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी एवढी खोल प्रयोगशाळा का खोदली गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे उत्तर चिनी शास्त्रज्ञांनीच दिले आहे. चिनी वृत्तसंस्थेला दिलेल्या उत्तरात प्रयोगशाळेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, आपण जितक्या खोलवर जाऊ तितके कॉस्मिक किरण थांबवू शकू. त्यामुळेच ही लॅब डार्क मॅटर शोधण्यासाठी सर्वोत्तम मानली जात आहे. 

Web Title: china-setsup-world-deepest-lab-jinping-know-what-special-in-this-lab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.