गोल्सपाई (स्कॉटीश हायलँड) : व्यालेल्या कुत्रीने हिरव्या रंगाच्या (मिंट ग्रीन) पिल्लाला जन्म दिला. व्यालेली कुत्री रिओ तीन वर्षांची असून तिने गेल्या आठवड्यात नऊ पिल्लांना जन्म दिला. अशी घटना अतिशय अतिशय दुर्मिळ असते व असे म्हटले जाते की जगात यापूर्वी केवळ तीनवेळा असे घडले होते. कुत्र्यांच्या नाळेत आढळणाऱ्या बिलिव्हर्दिन नावाच्या पित्त रंगद्रव्याला त्याचे श्रेय जाते.
आईच्या पोटात गर्भ असताना त्याचे संरक्षण व पोषण करणारा जो द्रव पदार्थ असतो त्यामुळे पिल्लाच्या कातडीचा रंग तसा होतो. रिओची मालकीण श्रीमती सुदरलँड यांनी या हिरव्या रंगाच्या बाळाचे नाव फॉरेस्ट ठेवले आहे. पिल्ले जन्माला येत होती तेव्हा आम्ही त्यांना पाहिले व त्यात एक पिल्लू हे हिरव्या रंगाच्या कातडीचे असल्याचे स्पष्टपणे दिसले. आमचा तर विश्वासच बसत नव्हता, असे सुदरलँड म्हणाल्या. हा रंग नंतर उडून जातो, असे आम्हाला सांगण्यात आले. लँकेशायरच्या एका जोडप्याकडील चॉकलेट रंगाच्या लॅब्राडोर जातीच्या कुत्रीने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हिरव्या रंगाच्या पिल्लाला जन्म दिला होता. स्पेनमध्येही असे पिल्लू जन्माला आले होते.