बीअरच्या कॅन्सचा छंद ४२ वर्षांनंतर केला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:05 AM2017-07-20T02:05:09+5:302017-07-20T02:05:09+5:30

वेळ, पैसा खर्च करून केलेला छंद बंद करायची, छंदातून जमलेल्या वस्तू गुंडाळून ठेवायची वेळ आलेल्याला काय म्हणणार? नॉर्थ सॉमरसेटमधील क्लेव्हेदोनमध्ये वास्तव्यास

Beer's cans stopped after 42 years | बीअरच्या कॅन्सचा छंद ४२ वर्षांनंतर केला बंद

बीअरच्या कॅन्सचा छंद ४२ वर्षांनंतर केला बंद

Next

लंडन : वेळ, पैसा खर्च करून केलेला छंद बंद करायची, छंदातून जमलेल्या वस्तू गुंडाळून ठेवायची वेळ आलेल्याला काय म्हणणार? नॉर्थ सॉमरसेटमधील क्लेव्हेदोनमध्ये वास्तव्यास असलेल्या निक वेस्ट (५८) यांनी बीअरचे कॅन गोळा करायचा छंद थांबवून घर आटोपशीर करायचे ठरवले. निक वेस्ट व त्यांची पत्नी दिबोराह
हे लॉईड्स बँकेतून नुकतेच निवृत्त झाले. त्यांच्याकडे बीअरचे रिकामे नऊ हजारांपेक्षा जास्त कॅन आहेत. निक वेस्ट यांची पत्नी दिबोराह हिने १९७५ मध्ये बीअरशी संबंधित पुस्तक निक यांच्यासाठी आणले व त्यांना बीअरचं रिकामे कॅन्स गोळा करायचा नाद लागला. हा छंद नंतर
वेडच बनला. निक रोज इंटरनेटवर नव्या कॅन्सच्या शोधात तासनतास घालवू लागले. कॅन वाढत गेले व निक यांनी घरात एका खोलीत ‘बीअर कॅन लायब्ररी’च थाटली. आता हा छंद नियंत्रणाबाहेर गेल्याचे त्यांनी पत्नी दिबोराह हिच्याकडे मान्य करून हा छंद थांबवला आहे.

Web Title: Beer's cans stopped after 42 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.