बांगलादेशात शेख हसीना यांची चौथ्यांदा येणार सत्ता?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 06:00 AM2018-12-31T06:00:47+5:302018-12-31T06:01:08+5:30

बांगलादेशाच्या ११ व्या संसदेसाठी रविवारी झालेल्या रक्तरंजित मतदानानंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगचे सरकार सलग चौथ्यांदा सत्तेवर येण्याची चिन्हे मतमोजणीच्या प्राथमिक रोखावरून दिसत आहेत.

Bangladesh's Sheikh Hasina will come fourth in power? | बांगलादेशात शेख हसीना यांची चौथ्यांदा येणार सत्ता?

बांगलादेशात शेख हसीना यांची चौथ्यांदा येणार सत्ता?

Next

ढाका : बांगलादेशाच्या ११ व्या संसदेसाठी रविवारी झालेल्या रक्तरंजित मतदानानंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगचे सरकार सलग चौथ्यांदा सत्तेवर येण्याची चिन्हे मतमोजणीच्या प्राथमिक रोखावरून दिसत आहेत. मतदानाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात १९ जणांचा मृत्यू झाला, तर पन्नासहून अधिक जखमी झाले. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) या प्रमुख विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर मतदानात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करीत निवडणुकीचे निकाल अमान्य केले आहेत.
एका मतदारसंघातील उमेदवाराचे निधन झाल्याने ३०० पैकी २९९ जागांसाठी मतदान झाले. सायंकाळी मतदान संपताच मतमोजणीस सुरुवात झाली. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे वृत्त देईपर्यंत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगला ९० जागा, त्यांच्या सहयोगी पक्षाला १३ जागा, तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला ३ जागा मिळाल्या आहेत. हाच रोख कायम राहिला, तर त्यांचे सरकार पूर्वीपेक्षा मोठ्या बहुमताने पुन्हा सत्तेवर येईल, अशी शक्यता दिसते. स्वत: शेख हसीना यांनीही मतदान केल्यानंतर देशातील लोकांना विकास हवा असल्याने ते पुन्हा आम्हालाच निवडून देतील, असा विश्वास व्यक्त केला.
निवडणुकीच्या प्रचारातही मोठा हिंसाचार होऊन वातावरण विखारी झालेच होते. तीच तेढ मतदानाच्या वेळीही कायम राहिली. अनेक ठिकाणी अवामी लीग व ‘बीएनपी’च्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक चकमकी झाल्या. दिवसभरात मरण पावलेल्या १९ जणांपैकी ८ अवामी लीगचे, तर ११ ‘बीएनपी’चे समर्थक असल्याचे समजते. स्वत: खालिदा झिया यांच्यावर निवडणूकबंदी असल्याने त्या निवडणूक रिंगणात नव्हत्या; परंतु पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील व बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांचे ज्येष्ठ सहकारी व विख्यात कायदेतज्ज्ञ कमाल होसेन यांनी सुमारे ४० वर्षांचा राजकारण संन्यास सोडून शेख हसीना यांच्या ‘भ्रष्ट’ सरकारपासून देशाला मुक्ती देण्यासाठी दंड थोपटले
आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Bangladesh's Sheikh Hasina will come fourth in power?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.