अजब प्रेमाची गजब गोष्ट ! 15 वर्षाचा नवरा आणि 73 वर्षांची वधू

By admin | Published: July 7, 2017 11:41 AM2017-07-07T11:41:44+5:302017-07-07T11:43:29+5:30

वयाच्या सीमा ओलांडत एका 15 वर्षाच्या मुलाने 73 वर्षाच्या महिलेशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे

Awesome love love! 15 year old husband and 73 year old bride | अजब प्रेमाची गजब गोष्ट ! 15 वर्षाचा नवरा आणि 73 वर्षांची वधू

अजब प्रेमाची गजब गोष्ट ! 15 वर्षाचा नवरा आणि 73 वर्षांची वधू

Next
ऑनलाइन लोकमत
जकार्ता, दि. 7 - प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, कारण प्रेमात अनेकदा वय, धर्म, जात पाहिलं जात नाही. काहीजणांच्या मते हे फक्त चित्रपट आणि पुस्तकातच शोभतं. पण इंडोनेशियामध्ये वयाच्या सीमा ओलांडत एका 15 वर्षाच्या मुलाने 73 वर्षाच्या महिलेशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. इंडोनेशियामधील सुमात्रा येथील ही घटना आहे. दोघांनीही आमचं लग्न न करुन दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांच्या लग्नाला परवानगी देण्यात आली, आणि दोघे विवाहबंधनात अडकले. 
 
हे प्रेमप्रकरण तेव्हा सुरु झालं जेव्हा 15 वर्षांच्या सेलामत रियादीला मलेरिया झाला होता. शेजारी राहणा-या रोहाया बिनती मोहम्मद जकफर यांनी यावेळी त्याची पुर्ण काळजी घेतली. त्यादरम्यानच दोघांमधील प्रेम फुलत गेलं अशी माहिती गावप्रमुख सिक ऐनी यांनी दिली आहे. 
 
आणखी वाचा - 
प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचनांसाठी रेल्वेने लाँच केलं वेबपोर्टल
मोदींच्या इस्त्रायल दौ-यात दोन्ही देशात 4.3 अब्ज डॉलरचे करार
सुखोई 30 विमान दुर्घटना : शहीद पायलटच्या वडिलांचं पंतप्रधान मोदींना पत्र
 
इंडोनेशियन कायद्यानुसार तरुणांसाठी लग्नाचं वय 19 तर मुलींसाठी 16 आहे. मात्र तरीही सुमात्रा गावाच्या प्रशासनाने या दोघांच्या लग्नासाठी मंजुरी दिली.
 
 "सेलामत रियादीचं अजून लग्नाचं वय नाही. लग्न करण्यासाठी तो खूप तरुण आहे. पण दोघांनीही आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याने आम्हाला त्यांच्या लग्नाला परवानगी द्यावी लागली", असं गावप्रमुख सिक ऐनी यांनी सांगितलं आहे. दोघांनी आत्महत्या केल्यास आपल्याला पाप लागेल या भीतीने अधिका-यांनीही या लग्नाला विरोध केला नाही. 
फोटो सौजन्य - एएफपी
 
"सेलामत रियादी अल्पवयीन असल्याने आम्ही हे लग्न धुमधडाक्यात न करता अत्यंत खासगी पद्धतीने करण्याचं ठरवलं", असंही त्यांनी सांगितलं आहे. सध्या तरी जोडप्याने शारिरीक संबंध ठेवू नये, असं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
 
सेलामत रियादीच्या वडिलांच्या काही वर्षापुर्वीच निधन झालं आहे. पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने दुसरं लग्न केलं. त्यामुळे सेलामत रियादीचा योग्य सांभाळ झालाच नाही. त्याची काळजी घेण्यासाठीही कोणी नव्हतं.   
 
रोहाया यांचं दोन वेळा लग्न झालं असून, दोन्ही वेळा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा आहे. हे त्यांचं तिसरं लग्न आहे. इंडोनेशियामधील एका दुर्मिळ भागात सुदूर कारंग एंडाह गावात त्यांचं लग्न झालं. मात्र त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि जगभरातील अनेकांनी यामध्ये रस घेत माहिती घेण्यास सुरुवात केली.  मी तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करतो अशी प्रतिक्रिया सेलामत रियादीने लग्नानंतर दिली आहे. 
 

 

Web Title: Awesome love love! 15 year old husband and 73 year old bride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.