इसिसने पाडले अमेरिकेचे विमान

By admin | Published: December 25, 2014 01:43 AM2014-12-25T01:43:14+5:302014-12-25T01:43:14+5:30

इराक व सिरिया गिळंकृत करणाऱ्या इस्लामिक संघटनेने अमेरिकन आघाडीचे एक लढाऊ विमान सिरियात पाडले असून

The American Airplane hit by Isis | इसिसने पाडले अमेरिकेचे विमान

इसिसने पाडले अमेरिकेचे विमान

Next

बैरुत : इराक व सिरिया गिळंकृत करणाऱ्या इस्लामिक संघटनेने अमेरिकन आघाडीचे एक लढाऊ विमान सिरियात पाडले असून, या विमानात असणाऱ्या जॉर्डनच्या वैमानिकाला ताब्यात घेतल्याचाही दावा केला आहे. इसिस जिहादींनी विमानावर गोळीबार करून ते पाडले असून, त्यातील अरब वैमानिकाला कैदी म्हणून ताब्यात घेतले आहे.
सिरियातील राका शहरात ही घटना घडली, असे सिरीयन आॅब्झर्वेटरी फॉर ह्यूमन राईटस्ने म्हटले आहे. या घटनेची अनेक छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली असून एका छायाचित्रात वैमानिकही दिसत आहे. या वैमानिकाने पांढरा शर्ट घातला असून, चार जण त्याला धरून नेताना छायाचित्रात दिसत आहेत. दुसऱ्या एका छायाचित्रात हा वैमानिक बसलेला असून त्याच्याभोवती १०-१२ सशस्त्र व्यक्तींचा गराडा आहे. जॉर्डनमधून या घटनेची प्रतिक्रिया मिळालेली नाही.
इस्लामिक स्टेटविरोधात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या देशात जॉर्डन आहे. सौदी अरेबिया, अरब अमिरात, जॉर्डन व बहारीन हे देश सिरियातील हवाई हल्ल्यात सहभागी आहेत, तर आॅस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्रिटन, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स व नेदरलँड हे देश इराकमध्ये छापा टाकण्यात सहभागी आहेत. इस्लामिक स्टेटचे जिहादी मोठ्या प्रमाणावर अत्याचार करीत असून, ताब्यात घेतलेल्या सैनिकांच्या सामूहिक हत्या, ओलिसांचे जाहीर शिरच्छेद असे प्रकार सर्रास चालले आहेत. अमेरिकन आघाडीची लढाऊ विमाने राका शहरावर नियमित गोळीबार करीत आहेत. (वृत्तसंस्था)

 

 

Web Title: The American Airplane hit by Isis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.