कॉपीमुक्त परीक्षेसाठी थांबवलं इंटरनेट, संपूर्ण देश झाला ऑफलाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 11:40 AM2018-06-21T11:40:23+5:302018-06-21T11:40:42+5:30

देशात सर्व केंद्रांवर मोबाइल फोन जॅमर आणि सीसीटीव्ही लावल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

Algeria blocks internet over five day to stop copy-based exam | कॉपीमुक्त परीक्षेसाठी थांबवलं इंटरनेट, संपूर्ण देश झाला ऑफलाइन

कॉपीमुक्त परीक्षेसाठी थांबवलं इंटरनेट, संपूर्ण देश झाला ऑफलाइन

Next

अल्जायर्स- परीक्षांमध्ये कॉपी होऊ नये, मुलांना कोणत्याही प्रकारे बाहेरुन मदत मिळू नये यासाठी धडपडणारी परिक्षा मंडळं आपण पाहिली असतील. तसेच या शाळेतून त्या शाळेत जाणाऱ्या भरारी पथकांच्या बातम्याही आपल्या कानावर आलेल्या असतात. पण एका देशाने कॉपी थांबविण्यासाठी संपूर्ण देशातील इंटरनेटच बंद केलं. अल्जेरियामध्ये हायस्कूल डिप्लोमाच्या परिक्षा सुरु झाल्यावर मुलांना कोणत्याही प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉपी करता येऊ नये यासाठी संपूर्ण देशाचे इंटरनेटच बंद करण्यात आले.  इंटरनेट, मोबाइल फोन तसेच इतर उपकरणांचा वापर करुन कॉपी केली जाते तसेच व्हॉटसअॅपचाही वापर करुन पेपर, उत्तरे पसरवली जातात. त्यामुळे या समस्येला थांबविण्यासाठी अल्जेरियाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.




मोबाइल आणि इतर सेवांमधील इंटरनेट काल दोन तासांठी थांबविण्यात आले होते. हायस्कूल डिप्लोमा चाचणी परीक्षा व्यवस्थित व्हावी यासाठी इंटरनेट बंद ठेवण्याच्या सूचना सरकारतर्फे करण्यात आली होती असं अल्जेरिया टेलिकॉमने स्पष्ट केलं आहे. जवळजवळ 7 लाख मुले विविध प्रकारच्या परीक्षा देत आहेत, त्यामुळे या काळामध्ये इंटरनेट सेवा अशीच खंडीत केली जाऊ शकते असेही सांगण्यात येते.


कॉपी थांबविण्यासाठी अल्जेरियातील 2000 पेक्षा जास्त केंद्रांवर मोबाइल आणि टॅबलेटसारख्या वस्तू आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. गेल्या वर्षी परीक्षा काळात सोशल मीडिया थांबविण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र त्यामुळे कॉपीची समस्या प्रश्न सुटण्यास मदत झाली नाही. अल्जेरियाचे शिक्षणमंत्री नुरिया बेंन्घारीट यांनी सर्व परीक्षाकेंद्रांच्या प्रवेशद्वारांजवळ मेटल डिटेक्टर आणि मोबाइल फोन जॅमर लावल्याचे तसेच सर्वत्र क्लोज सर्किट कॅमेरे लावल्याचे सांगितले.



 

Web Title: Algeria blocks internet over five day to stop copy-based exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.