Abh ..! One lacquer bill, given to recover a napkin, a 21-year-old youth | अबब..! 21 वर्षीय तरुणाला उबरने दिले एक लाखाचे बिल
अबब..! 21 वर्षीय तरुणाला उबरने दिले एक लाखाचे बिल

वेस्ट वर्जिनिया : आपण अनेकवेळा टॅक्सीतून प्रवास करतो. परंतु त्याचे भाडे जवळपास 100 ते 5000 रुपयांपर्यंत येते. मात्र अमेरिकामध्ये एखा उबरच्या टॅक्सीतून  482 किलोमीटर प्रवासाचे भाडे तब्बल एक लाख रुपये आल्याने एका प्रवाशाला आश्चर्याचा झटकाच बसला. 
मिळालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या केनी बॅकमैन या 21 वर्षीय तरुणाला एक लाख रुपयांचे बिल उबरने दिले. केनी कॅबमध्ये झोपला होता. 500 किमी दूर गेल्यानंतर त्याला जाग आली.  मिळालेल्या वृत्तानुसार, केनी कॅबमध्ये बसला त्यावेळी नशेत होता. 

केनी शुक्रवारी आपल्या मित्रांसोबत वेस्ट वर्जिनियामध्ये पार्टीमध्ये गेला होता. त्यानंतर त्याने दारुच्या नशेतच वेस्ट वर्जिनिया यूनिवर्सिटी कँपसमध्ये जाण्यासाठी कॅबला बोलवले.  कॅबमध्ये बसून वेस्ट वर्जिनिया यूनिवर्सिटी कँपसमध्ये जाताना त्याला डुलकी लागली. 500 किमीचा प्रवास झाल्यानंतर त्याचा डोळा उघडला तर तो  न्यू जर्सीत पोहचला होता. तिथेच उबरने त्याला एक लाखाचे बिल हातात दिले. हे बिल देण्यासाठी त्यानं 'गो फंड मी' या वेबसाईटची मदत घेतली. 

माध्यमांच्या वृत्तानुसार, केनी म्हणाला की,  ज्यावेळी मी झोपेतून उठलो त्यावेळी माझ्या बाजूला अनोळखी लोक बसले होता. त्यावेळी मला मी कुठे आलो हे मला काही समजले नाही. दरम्यान, कॅब कंपनीने केनीच्या या घटनेला दुजोरा दिला. ते म्हणाले की, केनीने ड्रायव्हरला जेथे सोडलायला सांगितले तिथेच त्याला सोडण्यात आलं. प्रावस संपल्यानंतर केनीनं चालकाला पाच रेटींग पॉईंट दिले आहेत. 


Web Title: Abh ..! One lacquer bill, given to recover a napkin, a 21-year-old youth
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.