कैरो, दि. 11 - इजिप्तमध्ये ट्रेन अपघातात 21 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात 55 जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. इजिप्तमधल्या अलेक्झांड्रिया या भागात हा अपघात झालाय. ट्रेन अपघातात जखमी झालेल्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन ट्रेनची एकमेकांनी धडक बसल्यानं हा अपघात झाला आहे. एक ट्रेन इजिप्तची राजधानी कैरोहून अलेक्झांड्रियाला जात असताना पाठीमागून त्या ट्रेनवर दुसरी ट्रेन येऊन आदळली आणि हा भीषण अपघात झाला. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.