११ शहरांना पाण्याच्या दुर्भिक्षाचा धोका, पिण्याच्या पाण्याची टंचाई, बंगळुरू शहरही काठावर उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:10 AM2018-02-13T01:10:10+5:302018-02-13T01:10:37+5:30

जगभरातील महत्त्वाच्या ११ शहरांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात भारतातील बंगळुरूचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन शहरात आताच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

11 cities suffer from water scarcity, drinking water scarcity, Bangalore city stand on edge | ११ शहरांना पाण्याच्या दुर्भिक्षाचा धोका, पिण्याच्या पाण्याची टंचाई, बंगळुरू शहरही काठावर उभे

११ शहरांना पाण्याच्या दुर्भिक्षाचा धोका, पिण्याच्या पाण्याची टंचाई, बंगळुरू शहरही काठावर उभे

googlenewsNext

केप टाऊन : जगभरातील महत्त्वाच्या ११ शहरांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात भारतातील बंगळुरूचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन शहरात आताच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
पृथ्वीचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असला तरी त्यापैकी ३ टक्केच पाणी पिण्याच्या योग्यतेचे आहे. जगभरातील १ अब्ज लोकांना पिण्याचे पाणी मिळविण्यास खूपच कष्ट करावे लागतात, तर २.७ अब्ज लोकांना वर्षातील किमान एक महिना पिण्याचे पाणी मिळविणे जवळपास अश्क्य होते. जगातील ५०० मोठ्या शहरांमधील दर चारपैकी एका शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते, असा निष्कर्ष या संदर्भात केलेल्या एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.
दुष्काळाचा जोरदार तडाखा बसलेल्या केपटाउनमध्ये सध्या जसे पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झाले आहे, तशी स्थिती बंगळुरूसह ११ शहरांमध्ये भविष्यात निर्माण होऊ शकते. भारत व चीनमधील शहरांतील वाढती लोकसंख्या व तिला मिळणारे पिण्याचे पाणी यांचे प्रमाण व्यस्त आहे. बंगळुरू शहरातील सांडपाणी व मलनिस्सारण व्यवस्थाही येत्या काही वर्षांमध्ये तोकडी पडण्याची चिन्हे आहेत. पाण्याच्या पाइपलाइन अत्यंत जुनाट झालेल्या असून, त्या बदलणे आवश्यक आहे. पाण्याच्या गळतीमुळे व गैरवापरामुळे बंगळुरू शहरातील अर्धे पाणी हे सांडपाण्याबरोबर वाहून जाते. बंगळुरू शहरातील एकाही तलावाचे पाणी पिण्यालायक राहिलेले नाही. त्यामुळे त्यांचा उपयोग केवळ औद्योगिक प्रकल्पांसाठी तसेच जलसंधारणासाठी होतो.
जगातील ज्या अन्य शहरांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य निर्माण होऊ शकते, त्यामध्ये बिजिंग, कैरो, जकार्ता, मॉस्को, इस्तंबूल, मेक्सिको, लंडन, साओ पावलो, जकार्ता यांचा समावेश असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बंगळुरूमध्ये दमछाक
बंगळुरू शहरात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी आपले जाळे विस्तारले. त्यानंतर देशभरातून तिथे काही लाख लोक राहावयास आले. शहराची संख्या वाढली. तसे बांधकामांनाही वेग आला. शहराचा विकास होऊ लागला. मात्र वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतक्या पिण्याच्या पाण्याची सोय करताना बंगळुरु शहराच्या पालिकेची व शासनाची दमछाक होत आहे.

Web Title: 11 cities suffer from water scarcity, drinking water scarcity, Bangalore city stand on edge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.