हॉकी विश्वचषक : भारत, बेल्जियम एकाच गटात ; सलामीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:04 AM2018-03-01T01:04:02+5:302018-03-01T01:04:02+5:30

यजमान भारताला भुवनेश्वर येथे २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान होणा-या पुरुष हॉकी विश्वचषकासाठी अनुकूल ड्रॉ मिळाला आहे. त्यात भारताला क गटात आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त बेल्जियम, जागातील ११ व्या स्थानावरील कॅनडा, आफ्रिका खंडातील चॅम्पियन दक्षिण आफ्रिका या संघासोबत ठेवण्यात आले आहे.

Hockey World Cup: India, Belgium in the same group; Open against South Africa | हॉकी विश्वचषक : भारत, बेल्जियम एकाच गटात ; सलामीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार

हॉकी विश्वचषक : भारत, बेल्जियम एकाच गटात ; सलामीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार

googlenewsNext

नवी दिल्ली : यजमान भारताला भुवनेश्वर येथे २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान होणा-या पुरुष हॉकी विश्वचषकासाठी अनुकूल ड्रॉ मिळाला आहे. त्यात भारताला क गटात आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त बेल्जियम, जागातील ११ व्या स्थानावरील कॅनडा, आफ्रिका खंडातील चॅम्पियन दक्षिण आफ्रिका या संघासोबत ठेवण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाद्वारे बुधवारी घोषणा करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आशियाई चॅम्पियन भारताची सलामीची लढत २८ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असणार आहे. तसेच २ डिसेंबरला ते बेल्जियम आणि ८ डिसेंबरला कॅनडा संघाविरुद्ध दोन हात करतील.
अ गटात रिओ २०१६ आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना, न्यूझीलंड, स्पेन आणि फ्रान्स या संघांना स्थान मिळाले आहे. प्राथमिक फेºयांत काही महत्त्वाच्या लढती पाहायला मिळणार आहेत. त्यात ड गटातील दोन माजी विश्व चॅम्पियन जर्मनी व पाकिस्तान १ डिसेंबरला आमने-सामने उभे ठाकणार आहेत. इंग्लंडचा संघ ४ डिसेंबरला ब गटात आॅस्ट्रेलियावर सनसनाटी विजय मिळविण्याचा प्रयत्न करील. प्रत्येक गटातील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरी गाठतील. (वृत्तसंस्था)
गट पुढीलप्रमाणे
अ गट : अर्जेंटिना, न्यूझीलंड, स्पेन आणि फ्रान्स
ब गट : आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, चीन
क गट : बेल्जियम, भारत, कॅनडा, दक्षिण आफ्रिका
ड गट : नेदरलँड, जर्मनी, मलेशिया, पाकिस्तान

Web Title: Hockey World Cup: India, Belgium in the same group; Open against South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी