बत्रा, मेहता यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:17 AM2017-12-14T02:17:41+5:302017-12-14T02:17:51+5:30

भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) गुरुवारी होणाºया वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्या नावाची ‘आयओए’च्या अध्यक्षपदी शिक्कामोर्तब होणार आहे.

Batra, Mehta's name will be accepted today | बत्रा, मेहता यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार

बत्रा, मेहता यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार

Next

नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) गुरुवारी होणा-या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्या नावाची ‘आयओए’च्या अध्यक्षपदी शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच विद्यमान महासचिव राजीव मेहता यांची पुन्हा दुसºया कार्यकाळासाठी या पदावर निवड होईल.
चार वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्षपदावर बत्रा यांच्या नावाची निवड होण्याची औपचारिकता गुरुवारी पार पडेल. मात्र प्रक्रियानुसार बत्रा यांना या पदासाठी अखिल भारतीय टेनिस संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांच्याविरुद्ध निवडणूक लढवावी लागेल. खन्ना यांनी वेळेची मर्यादा ओलांडल्यानंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले होते. खन्ना यांनी निर्धारित ३ डिसेंबरपर्यंत आपले नाव मागे घेतले नव्हते. परंतु, ७ डिसेंबरला त्यांनी निवडणूक आयोगाला निवडणूक लढणार नसल्याचे कळवले व अध्यक्षपदासाठी आपले समर्थन बत्रा यांना असेल, असेही सांगितले होते. ‘आयओए’ परिवाराला एकत्रित ठेवण्यासाठी आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याची भूमिका खन्ना यांनी घेतली.
याआधी या निवडणुकीमध्ये बत्रा यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र, निवडणूक अधिकारी एस. के. मेंदीरत्ता यांनी २०१२ आणि २०१४ मध्ये निवडण्यात आलेल्या कार्यकारी परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य अध्यक्षपद आणि महासचिव पदासाठी निवडणूक लढवू शकतात, असे स्पष्ट केले. यानंतर बत्रा यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यानंतर ‘आयओए’ने आपल्या विशेष बैठकीत सर्वसंमतीनुसार २०१२ व २०१४ साली निवडून आलेल्या पदाधिकाºयांना व कार्यकारी परिषदेच्या सदस्यांना यंदाच्या निवडणुकीत लढण्याची परवानगी दिली. (वृत्तसंस्था)

Web Title: Batra, Mehta's name will be accepted today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी