Asian Games 2018: आशियाई स्पर्धेमध्ये हॉकीत ‘खुशी थोडी, जादा गम’; महिला संघ चमकला, पण सुवर्ण हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 01:21 AM2018-09-05T01:21:44+5:302018-09-05T01:21:51+5:30

आशियाडमध्ये हॉकीत भारताची कामगिरी ‘थोडी खुशी, जादा गम’ अशीच राहिली. आनंद एवढाच की महिला हॉकी संघ तब्बल २० वर्षानंतर अंतिम फेरीत पोहचला आणि आपण रौप्यपदक जिंकले, मात्र ही एक बाब सोडली तर निराशाच निराशा!

Asian Games 2018: Women's team good work, but gold bowlers | Asian Games 2018: आशियाई स्पर्धेमध्ये हॉकीत ‘खुशी थोडी, जादा गम’; महिला संघ चमकला, पण सुवर्ण हुकले

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेमध्ये हॉकीत ‘खुशी थोडी, जादा गम’; महिला संघ चमकला, पण सुवर्ण हुकले

Next

- ललित झांबरे

जळगाव : आशियाडमध्ये हॉकीत भारताची कामगिरी ‘थोडी खुशी, जादा गम’ अशीच राहिली. आनंद एवढाच की महिला हॉकी संघ तब्बल २० वर्षानंतर अंतिम फेरीत पोहचला आणि आपण रौप्यपदक जिंकले, मात्र ही एक बाब सोडली तर निराशाच निराशा!
गतवेळच्या विजेत्या पुरूष संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, मात्र साखळी फेरीत गोलांची बरसात केल्यावर नेमक्या उपांत्य सामन्यात भारतीय पुरुषांना मलेशियाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये ७-६ असा पराभव पत्करावा लागला. या आशियाडमधील सात सामन्यांतला भारताचा हा एकमेव पराभव, पण त्याने आपल्याला थेट कांस्यवर समाधान मानायला भाग पाडले. आशियाडच्या इतिहासात ३ सुवर्ण आणि ९ रौप्यपदकांची कमाई केलेल्या भारतीय संघ १९८६ व २०१० नंतर तिसऱ्यांदा कांस्यपदकावर मर्यादीत राहिला. यामुळे आॅलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळविण्याचीही संधी आपण गमावली. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-१ अशी मात देत आपण कांस्यपदक जिंकले. महिला संघानेही साखळीत गोलांची बरसात केली, मात्र अंतिम सामन्यातील जपानकडून २-१ अशा पराभवाने त्यांनीही आॅलिम्पिक थेट पात्रतेची संधी गमावली. पण अंतिम सामन्यात महिला संघाने जपानला दिलेली झुंज कौतुकास्पद होती.
उपांत्य सामन्यात उशिराने मलेशियाला गोल करण्याची संधी देत भारतीय पुरुषांनी पायावर धोंडा पाडून घेतला. मलेशियाने त्यांची शैली असलेल्या जोरदार प्रति आक्रमणाचे तंत्र वापरून आपले दोन्ही गोल केले. भारताने चेंडू ताब्यात राखण्यात व समांतर पासेस देण्यात वेळ घालवला आणि कितीतरी चुका केल्या, त्याची किंमत चुकवावी लागली.
त्यावर हॉकी इंडिया व भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करत प्रशिक्षक हरेंद्र सिंग व त्यांच्या स्टाफला आगामी विश्वचषक ही शेवटचीे संधी असल्याचा इशारा दिला. याचवेळी पुरूष संघातील खेळाडूंचे खेळापेक्षा सोशल मिडीया व इतर बाबींकडेच अधिक लक्ष असून संघाला शिस्तीची गरज असल्याचे मत हॉकी इंडियाच्या पदाधिकाºयांनी मांडले आहे.

Web Title: Asian Games 2018: Women's team good work, but gold bowlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी