बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:22 PM2018-10-21T23:22:04+5:302018-10-21T23:22:22+5:30

जिल्ह्यात सर्रासपणे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. रूग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या मुन्नाभार्इंवर आरोग्य विभागाकडून मात्र ठोस कारवाई होताना दिसून येत नाही.

 When did the bogus doctors take action? | बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी?

बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात सर्रासपणे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. रूग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या मुन्नाभार्इंवर आरोग्य विभागाकडून मात्र ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागात फिरत्या बोगस डॉक्टरांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे आता या बोगस डॉक्टरांना आवर घालणे हा आरोग्य विभागासमोर मोठा प्रश्न आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही नियमानुसार परवानगी अथवा डिग्री नसताना हे बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. हा सर्व प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परंतु याबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणा मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच बोगस डॉक्टरांविरूद्ध सहसा कोणी तक्रार दाखल करण्यास धजावत नाही. त्यामुळे आरोग्य विभागालाही तक्रारविना कारवाई करता येत नसल्याचे सांगण्यात आले. याचाच फायदा घेत जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढत असून बिनदिक्तपणे राजेशाही इमारतींमध्ये दवाखाने थाटली जात आहेत. याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे औंढा तालुक्यातील सेंदुरसेना गावाजवळील एका शेतात वैद्यकीय परवाना नसताना रूग्णांच्या जीवाशी खेळणाºया बंगाली डॉक्टरचा पर्दाफाश झाला होता. या बोगस डॉक्टराविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार यांनी संबधित यंत्रणेला दिले होते. बंगाली बोगस डॉक्टरच्या वैद्यकीय डीग्रीतही तफावत आढळून आली होती. नावात व वेगळवेगळ्या ठिकाणावरून बोगस वैद्यकीय डिग्री या डॉक्टरने मिळविल्या होत्या. याप्रकरणी अजूनही कारवाईची प्रक्रिया सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात डॉक्टर वेळेवर हजर नसतात. परिणामी रुग्णांवर वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे गरिब रुग्णांना खासगी दवाखान्याशिवाय पर्याय नसतो. ज्यांना खाजगी दवाखान्यात उचार घेणे शक्य नाही, असे रूग्ण मग या बोगस डॉक्टरांच्या तावडीत सापडतात. परंतु सरकारी दवाखान्यातील असुविधेमुळे मात्र मुनाभार्इंना दिवसेंदिवस अच्छे दिन येत असल्याचे चित्र आहे. रूग्णांच्या जीवाशी खेळणाºया या बोगस डॉक्टरांना आवार घालण्याची मागणी जनतेतून होत आहे.
गतवर्षी सहा बोगस डॉक्टरांची नावे केली जाहीर
गतवर्षी आॅक्टोबर महिन्यातच बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घाळण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक घेण्यात आली होती. यात सहा डॉक्टरांना बोगस घोषित करण्यात आले होते. सदर बैठकीमध्ये बोगस डॉक्टरांची नावेही जाहीर करण्यात आली होती. यात वसमत, सेनगाव व औंढा येथील बोगस डॉक्टरांचा समावेश होता. कोणाकडे डिग्री नव्हती तर कोणाचा डिप्लोमा नव्हता. अनेकांकडे तर नोेंदणी प्रमाणपत्रही नव्हते. त्यामुळे या सहा जणांना बोगस डॉक्टर म्हणून घोषित करण्यात आले होते.
ग्रामीण भागात वद्ध रूग्ण किंवा गावापासून दवाखाना दुर असल्याने दुचाकीवरून फिरणारे डॉक्टर अशा गावांना भेटी देतात. थेट सलाईन लावून औषधोपचार करतात.

Web Title:  When did the bogus doctors take action?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.