सेना उपजिल्हाप्रमुखाला तडीपारीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:31 AM2019-02-21T00:31:35+5:302019-02-21T00:32:37+5:30

येथील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्यावर उपविभागीय पोलीस कार्यालयाने तडीपारीची कारवाई प्रस्तावित केली असून त्या अनुषंगाने देशमुख यांना नोटीस बजावण्यात आली असल्याने तालुक्यातील शिवसेनेच्या राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.

 Suspicious notice of army sub-district | सेना उपजिल्हाप्रमुखाला तडीपारीची नोटीस

सेना उपजिल्हाप्रमुखाला तडीपारीची नोटीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्यावर उपविभागीय पोलीस कार्यालयाने तडीपारीची कारवाई प्रस्तावित केली असून त्या अनुषंगाने देशमुख यांना नोटीस बजावण्यात आली असल्याने तालुक्यातील शिवसेनेच्या राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.
सेनगाव तालुक्यात शिवसेनेची मदार साभाळणारे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांचा निकाल लागला असून निर्दोष सुटले आहेत. काही गुन्हे न्यायप्रविष्ट असून काही तपासावर आहेत. मराठा आरक्षणाचा आंदोलनात सेनेचे देशमुख यांच्यावर वेगवेगळ्या घटनेत तीन गुन्हे दाखल झाले होते. त्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या वतीने संदेश देशमुख यांच्याविरोधात तडीपारीची कारवाई प्रस्तावीत केली आहे.
ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक ए.जी.खान यांनी १६ फेब्रुवारीला आपणास हिगोली, वाशिम, नादेड, यवतमाळ, परभणी आदी ५ जिल्ह्यांतून प्रस्तावीत तडीपारीची नोटीस बजावली असून उत्तर देण्यासाठी २० फेब्रुवारीला सुनावणी ठेवली आहे.
या तडीपारीच्या कारवाईने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ही कारवाई प्रस्तावित झाली असल्याने राजकीय दबावाखाली कारवाई होत असल्याचा आरोप युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण महाजन यांनी केला
आहे.

Web Title:  Suspicious notice of army sub-district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.