कविसंमेलनाने दिले सामाजिक भान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:18 AM2018-12-01T00:18:22+5:302018-12-01T00:18:26+5:30

तो सुशिक्षित, उच्च पदस्थ, वेल एज्युकेटेड, भाषेवर त्याची कमांड, म्हणूनच की काय बाहेर पार्टीत जेवढं चांगलं बोलतो, तेवढ्याच घाणेरड्या अगदी खालच्या थराच्या शिव्या देतो तिला घरात...प्रा. संध्या रंगारी यांच्या वारसा या कवितेने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून आत्मपरीक्षण करायला लावले.

 Social awareness | कविसंमेलनाने दिले सामाजिक भान

कविसंमेलनाने दिले सामाजिक भान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तो सुशिक्षित, उच्च पदस्थ, वेल एज्युकेटेड, भाषेवर त्याची कमांड, म्हणूनच की काय बाहेर पार्टीत जेवढं चांगलं बोलतो, तेवढ्याच घाणेरड्या अगदी खालच्या थराच्या शिव्या देतो तिला घरात...प्रा. संध्या रंगारी यांच्या वारसा या कवितेने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून आत्मपरीक्षण करायला लावले.
हिंगोली येथील कल्याण मंडपम् येथे हिंगोली ग्रंथोत्सवात निमंत्रीतांचे कवी संमेलन हिंगोलीकर रसिकांसाठी पर्वनी ठरले. दुपारच्या सत्रात कवयीत्री संध्या रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. यात हिंगोली जिल्ह्यातील २४ निमंत्रित कविंनी आपल्या कविता सादर केल्या. सामाजिक भानाच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रोखठोक भाष्य करणाºया कवितांसमवेत प्रेम कविताही सादर करण्यात आल्या. कवि बबन मोरे यांनी साहेब तुमचं इलेक्शन कुणालाच पटेना, हे येवो की तो येवो कोणालाच काही वटेना, अशी राजकीय मल्लीनाथी करणारी कविता सादर केली. डॉ. जब्बार पटेल यांनी संत नामदेव जगी अवतरला ही कविता सादर केली. राजाराम बनसकर यांनी तिची ती नावाची कविता सादर करून करपलेल्या कोवळ्या मुलीच्या आयुष्याची व्यथा मांडली. कलानंद जाधव यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ताशेरे ओढणारे कविता सादर केली तर शिलवंत वाढवे यांनी ‘महापुरूषांचे विचार कधीच मरत नसतात, असे म्हणून मोकळे झालो आम्ही’ ही व्यवस्थेवर शंका घेण्यास वाव आहे. कविता सादर केली. मुरलीधर पंढरकर यांनी काय त्या मुक्याचं रं जीन, ही कविता सादर केली. कवी शिवाजी घुगे यांनी ‘फुलण्यासाठी ºहदय कोवळे, परिस्थितीची हवा पाहिजे, जगण्यासाठी मद्य घेतले, मरण्यासाठी दवा पाहिजे’. ही गजल सादर केली. कवि रतन आडे यांनी छाटून टाकतो माझ्यातल्या तत्वाचं झाड, प्राचार्य नामदेव वाबळे यांनी सल, देवीदास खरात यांनी ‘आता तरी मोदी राजा सांगशिल का अच्छे दिन म्हणतात ते दावशिल का’ ही सद्यपरिस्थितीवर भाष्य करणारी कविता सादर केली. सिंद्धूताई दहिफळे यांती ती मायेची उतरंड, प्रा. संदीप दाभाडे- अनहोणी, प्रा. मारोती कोल्हे- प्रेम कविता, अहेमद किरण- प्रेम कविता, प्रेरणा किशोर क ांबळे- मी एक पुस्तक बोलते. शीला किशोर कांबळे- स्वाभीमान, डॉ. नितीन नाईक- मैत्री, डॉ. विलास खरात- शेतकरी आत्महत्या, महासेन प्रधान- त्याच नाव भीमराव, अण्णा जगताप- मसजून घे दादा, जयप्रकाश पाटील- आडमुठ म्हशी या कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन प्रा. जयप्रकाश पाटील यांनी केले. तर आभार ग्रंथालय संचालक मिलिंद कांबळे यांनी मानले.

Web Title:  Social awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.