पुन्हा सहा टँकर रॉकेलची नियतनघट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:00 AM2018-01-24T01:00:09+5:302018-01-24T01:00:09+5:30

गॅस सिलिंडर स्टॅम्पिंगनंतर आता वाढीव गॅस जोडण्या समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रॉकेलचे नियतन घटले आहे. जिल्ह्यातील पाच टँकर रॉकेल कमी झाले असून त्यामुळे रॉकेलच्या दुहेरी लाभामुळे होणारा काळा बाजार थांबण्यास मदत होणार आहे.

 Rectification of six tanker kerosene again | पुन्हा सहा टँकर रॉकेलची नियतनघट

पुन्हा सहा टँकर रॉकेलची नियतनघट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : गॅस सिलिंडर स्टॅम्पिंगनंतर आता वाढीव गॅस जोडण्या समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रॉकेलचे नियतन घटले आहे. जिल्ह्यातील पाच टँकर रॉकेल कमी झाले असून त्यामुळे रॉकेलच्या दुहेरी लाभामुळे होणारा काळा बाजार थांबण्यास मदत होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात कधीकाळी साडेतीन हजार केएल रॉकेल मिळायचे. नंतर नियतन घटल्याने ते अडीच हजार, दीड हजार व आता केवळ साडेसातशे केएलपर्यंत खाली आले होते. मागील काही दिवसांपासून एवढेच केएल रॉकेल येत होते. १२ केएलचे एक टँकर असते. जिल्ह्याच्या नियतनातून ६0 केएल रॉकेल पुन्हा एकदा कमी झाले आहे. जिल्ह्यात दोन जोडण्या असलेले सिलिंडरधारक हिंगोली-७८१४ण कळमनुरी ४७७, सेनगाव-२५१३, वसमत-४९७0 तर औंढ्यात १५३६ एवढे आहेत. त्यात नव्याने काही बदल झाला नाही. तर एक गॅस जोडणी असलेले शिधापत्रिकाधारक हिंगोली १४५४0, कळमनुरी-३६९७, सेनगाव-८७७१, वसमत-१0९७२, औंढा-३२९६ असे एकूण ४१ हजार २७६ एवढे होते. नव्याने शोधलेल्या गॅस जोडणी धारकांमुळे आता यात ५७ हजार २४३ जण असल्याचे समोर आले आहे. यात हिंगोली-१७८४६, कळमनुरी-८५४७, सेनगाव-११६३८, वसमत-१४७0४, औंढा-४५0८ अशी वाढल्यानंतरची संख्या आहे.
यासाठी सर्व तहसीलदारांना आदेशित केले होते. त्यानंतर त्यांनी ही नवीन आकडेवारी सादर केली. यातील जोडणीधारकांच्या नावचे रॉकेल नियतन कमी करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे. त्यामुळे जुन्याच पद्धतीने नियतन मंजूर असले तरी ते समर्पित केले जाणार आहे.
अशी झाली घट : दरमहा १५ लाख वाचणार
आता हिंगोलीचे १५६ हून १४४ केएल, कळमनुरीचे १९८ वरून १८0, सेनगावचे १२0 वरून १0८, वसमतचे १५0 वरून १३८ तर औंढ्याचे १२0 वरून ११४ केएल एवढे नियतन झाले आहे. हिंगोली, सेनगाव, वसमतचे एक, कळमनुरीचे दीड तर औंढ्याचे अर्धा टँकर नियतन घटले.
प्रत्येक तालुक्यात रेशनवरील रॉकेलचा दर वेगळा आहे. यात हिंगोली-२४.१६, वसमत-२४.६0, कणमनुरी-२४.२९, सेनगाव-२४.३६ तर औंढ्यात २४.३0 रुपये असा दर आहे. त्यामुळे सरासरी २४.२५ रुपये दर पकडला तरी दरमहा १५ लाख रुपये बचत होणार आहे.
रॉकेलचे दरही मागील काही महिन्यांपासून महिन्यात दोनदा २५ पैशांनी वाढविले जात आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी वेगळा दर असतो. ही वाढ दिसायला कमी असली तरीही एका वर्षात सहा रुपये एवढी आहे.

Web Title:  Rectification of six tanker kerosene again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.