प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:31 PM2018-08-31T23:31:24+5:302018-08-31T23:31:59+5:30

शासनाकडून १ सप्टेंबर २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेस प्रारंभ करण्यात आला. वर्षपूर्ती झाल्याने देशभरात १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत राष्टÑीय आरोग्य अभियानच्या माध्यमातून मातृवंदना सप्ताह राबविण्यात येणार आहे.

 Prime Minister Matruvandana Week | प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताह

प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शासनाकडून १ सप्टेंबर २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेस प्रारंभ करण्यात आला. वर्षपूर्ती झाल्याने देशभरात १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत राष्टÑीय आरोग्य अभियानच्या माध्यमातून मातृवंदना सप्ताह राबविण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने गतवर्षीपासून ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजना सुरू केली. सुदृढ व निरोगी बालक जन्माला यावे, तसेच गरोदरमाता व बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट व्हावी, यासाठी सदर योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यानुषंगाने जिल्हा आरोग्य विभागातर्फे हजारो गरोदर मातांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना ५ हजार रूपये तीन टप्प्यांत देत आधार संलग्नित बँक खात्यावर रक्कम जमा केली जाते. पहिला हप्ता १ हजार रुपये असून यासाठी गरोदरपणाची नोंद आरसीएच पोर्टलमध्ये एएनएमकडे १५० दिवसांत करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता २ हजार, तिसरा हप्ता २ हजार असे एकूण ५ हजार दिले जातात. जास्तीत जास्त गरोदर मातांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी केले आहे.

Web Title:  Prime Minister Matruvandana Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.