वसमत येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू;४४०० हमीभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:59 AM2018-04-16T00:59:19+5:302018-04-16T00:59:19+5:30

वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने वसमत येथे नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र सुरू झाले आहे. हरभऱ्याला ४४०० रुपये हमीभाव जाहीर झालेला आहे. हमीभावाने होत असलेल्या हरभरा खरेदीचा लाभ शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन चेअरमन राजेश पाटील इंगोले यांनी केले.

 Launch of grocery shopping center at Vasat; 4400 Guarantee | वसमत येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू;४४०० हमीभाव

वसमत येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू;४४०० हमीभाव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने वसमत येथे नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र सुरू झाले आहे. हरभऱ्याला ४४०० रुपये हमीभाव जाहीर झालेला आहे. हमीभावाने होत असलेल्या हरभरा खरेदीचा लाभ शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन चेअरमन राजेश पाटील इंगोले यांनी केले.
वसमत मार्केट यार्डात शुक्रवारी हरभरा खरेदी केंद्रास सुरूवात झाली . खरेदी विक्री केंद्राच्या माध्यमातून नाफेड हरभरा खरेदी करणार आहे. यावर्षी हरभºयाला ४४०० रुपये हमीदर जाहीर झाला आहे. वसमत तालुक्यात यावर्षी हरभºयाचे पीक जोरात आहे. हवामनामुळे हरभºयाला उताराही चांगला आहे. मार्केटमध्ये हरभरा विक्रीसाठी येणे सुरूवात झाली आहे. व्यापारी ३५०० ते ३६०० रुपये दराने खरेदी करत आहेत. हमीदराने हरभरा खरेदी व्हावा, यासाठी बाजार समितीने नाफेडची खरेदी सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. बाजार समितीकडे अद्यापपर्यंत ४५० हरभरा उत्पादकांनी नोंदणी केलेली आहे. आता हमीभावाने खरेदी होणार असल्याने खरेदी केंद्रावर हरभरा येण्याचे प्रमाण निश्चित वाढणार आहे. शुक्रवारी हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी चेअरमन राजेश पाटील इंगोले, मार्केटींग फेडरेशनचे बाबूराव भेंडेगावकर, उपसभापती अशोक अडकिणे, तुषार जाधव, सचिन सोपान शिंदे यांच्यासह संचालक, शेतकरी, व्यापारी आदींची उपस्थिती होती.

Web Title:  Launch of grocery shopping center at Vasat; 4400 Guarantee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.