खरिपासाठी १.0८ लाख क्विंटल बियाणे हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:59 AM2018-05-14T00:59:31+5:302018-05-14T00:59:31+5:30

जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून १.0८ लाख क्ंिवटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. विविध वाणांची ही एकत्रित आकडेवारी असून कपाशीची २.१८ लाख बीटी व नॉनबीटीची पाकिटेही मागविली आहेत.

 Kharif requires 1.08 lakh quintals of seeds | खरिपासाठी १.0८ लाख क्विंटल बियाणे हवेत

खरिपासाठी १.0८ लाख क्विंटल बियाणे हवेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून १.0८ लाख क्ंिवटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. विविध वाणांची ही एकत्रित आकडेवारी असून कपाशीची २.१८ लाख बीटी व नॉनबीटीची पाकिटेही मागविली आहेत.
हिंगोली जिल्ह्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३.४0 लाख हेक्टर असून यंदा खरिपासाठी ३.५५ लाख हेक्टर प्रस्तावित आहे. यात गतवर्षीएवढे १.0८ लाख क्विंटल बियाणांची महाबीज व खाजगी कंपन्यांकडून मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ज्वारी ७५२ क्ंिवटल, बाजरी-२.३, भात-५, मूग-७४८, उडीद-४८५, तूर-३८७७, संकरित कापूस-१0९२, मका-११८, तीळ-५.६, भूईमूग-५, सोयाबीन- १.0३ लाख क्ंिवटल अशी मागणी करण्यात आली आहे. यात सर्वाधिक सोयाबीन व कपाशीची मागणी आहे. कपाशीची ४३ हजार ६८४ हेक्टरवर लागवड अपेक्षित असल्याने बीटीची बीजी-१ ची २१ हजार, बीजी-२ ची १.६६ लाख तर नॉन बीटीची ३१ हजार ३८५ पाकिटे मागविण्यात आली आहेत. या तिन्ही प्रकारातील तालुकानिहाय पाकिटांची मागणी औंढा ना.-४0५१0, वसमत-८९७८५, हिंगोली-१३११0, कळमनुरी-५५१९५, सेनगाव-१९८२0 अशी आहे. सार्वजनिक कंपन्यांकडून होणारे उत्पादन कमी असल्याने अवघे ७३४२ क्ंिवटल बियाणे त्यांच्याकडून मिळेल, अशी अपेक्षा आहे. तर १.0३ क्ंिवटल बियाणांसाठी खाजगी कंपन्यांवर निर्भर राहावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी खाजगी कंपन्यांचे बियाणे घेताना बिले जपून ठेवत कोणत्याही विशिष्ट वाणाची कास धरू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले. तर कृषी विभागाचा सल्ला घेवून पर्यायी बियाणे निवड करण्यासही सांगण्यात आले. यामुळे शेतकºयांची फसवणूक होणार नाही. विविध कंपन्याद्वारे दरवर्षी अनेक शेतकºयांची फसवणुक होते. योग्य बियाणांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले.
हंगामापूर्वी कापसाची लागवड करू नका- कृषी अधीक्षक
४शेतकºयांनी हंगामपुर्वी कापसाची लागवड करू नये. हंगामपुर्वी लागवड केल्यास कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. कापूस व सोयाबीनमध्ये आंतरपिके घ्यावीत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी केले आहे. खरेदीची पावती कोणी देत नसल्यास संबधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल. तसेच दुकानाचा परवानाही निलंबित करण्यात येईल. खरेदीची पावती मिळत नसल्यास शेतकºयांनी तात्काळ कृषि अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकºयांनी बनावट कंपन्याकडून बियाणे तसेच कुठलेही वाण खरेदी करू नये. बोगस कंपन्यांपासून शेतकºयांनी सावधानता बाळगावी. विशेष म्हणजे कापसाच्या बाबतीत शेतकºयांना तणनाशक प्रतिबंधक म्हणून कंपन्याकडून फसवणुक केली जाते. त्यामुळे शेतकºयांनी सावध राहावे.
तननाशक प्रतिंबंधक असा प्रचार सध्या विविध कंपन्याकडून सुरू आहे. सदर कंपन्या असे वाण काढण्यात आल्याची खोटी माहिती देत आहे. त्यामुळे शेतकºयांनी शासनमान्य कंपन्यांचे वाण खरेदी करावे असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले.
महाबीज मार्फत खरीप हंगाम २०१८-१९ साठी सोयाबीन, उडीद पिकांचे प्रमाणित, पायाभूत बियाणे उत्पादनासाठी अग्रीम आरक्षण योजनेत बिजोत्पादक शेतकºयांना कार्यक्रमात सहभागी करून घेतले होते.

Web Title:  Kharif requires 1.08 lakh quintals of seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.