हिंगोली येथील कनेरगाव नाका येथे पंक्चर काढणाऱ्याची अज्ञाताकडून हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:45 PM2018-06-27T12:45:49+5:302018-06-27T13:38:17+5:30

कनेरगाव नाका येथे पंक्चर काढणाऱ्या एका कारागिराची अज्ञाताकडून हत्या झाल्याची घटना आज पहाटे ६ वाजता उघडकीस आली. 

Kennargaon Naka, a resident of Hingoli, who was awarded the award for murder, has been murdered | हिंगोली येथील कनेरगाव नाका येथे पंक्चर काढणाऱ्याची अज्ञाताकडून हत्या 

हिंगोली येथील कनेरगाव नाका येथे पंक्चर काढणाऱ्याची अज्ञाताकडून हत्या 

googlenewsNext

हिंगोली :  तालुक्यातील कनेरगाव नाका येथे पंक्चर काढणाऱ्या एका कारागिराची हत्या झाल्याची घटना आज पहाटे ६ वाजता उघडकीस आली. 

साहिल इसक सिद्दिक (३३) असे मयताचे नाव आहे. ते मुळचे बिहार राज्यातील रहिवासी असून, मागील १५ वर्षांपासून कनेरगाव नाका येथेच वास्तव्यास होते. त्यांचे गोरेगाव रस्त्यावरील एका ढाब्याजवळ पंक्चर काढण्याचे दुकान आहे. आज पहाटे ढाब्यावरील एका बाजेवर त्यांचा मृतदेह झाकून ठेवलेल्या अवस्थेत आढळला. 

घटनास्थळी उपविभागीय पोलीस  अधिकारी सिद्धेश्वर भोरे, पोनि जगदिश भंडारवार, फाँरेसींक लॅबचे मोरे, गोरेगावचे सपोनि कोरंटलू, सुनिल खिल्लारे, मोहन धाबे, शिवाजी शिंदे आदीनी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करुन प्रेत जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छदनासाठी पाठविले आहे. या घटनेमागचे कारण अजून समोर आलेले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Kennargaon Naka, a resident of Hingoli, who was awarded the award for murder, has been murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.