हिंगोलीत आजपासून जिजाऊ व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:54 PM2018-01-01T23:54:44+5:302018-01-01T23:55:02+5:30

शहरातील महावीर भवन येथे (स्मृतिशेष ग्यानबाराव शिरसाट विचारमंच) २ जानेवारीपासून जिजाऊ व्याख्यानमालेस प्रारंभ होणार आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगे्रड व जिजाऊ ब्रिग्रेड यांच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

Jijau lecture from today in Hingoli | हिंगोलीत आजपासून जिजाऊ व्याख्यानमाला

हिंगोलीत आजपासून जिजाऊ व्याख्यानमाला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील महावीर भवन येथे (स्मृतिशेष ग्यानबाराव शिरसाट विचारमंच) २ जानेवारीपासून जिजाऊ व्याख्यानमालेस प्रारंभ होणार आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगे्रड व जिजाऊ ब्रिग्रेड यांच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिजाऊ व्याख्यानमाला २ ते ४ जानेवारी या कालावधीत दररोज सायंकाळी ७.३० या वेळेत घेतली जाणार आहे. २ जानेवारी रोजी पहिल्या दिवशी ‘पारंपरिकता आणि आधुनिकतेमधील आजच्या महिला’ या विषयावर जिजाऊ ब्रिग्र्रेडच्या पूनमताई पारसकर व्याख्यान देणार आहेत. यावेळी जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे उपस्थित राहणार आहेत. तर ३ जानेवारी रोजी धार्मिक उन्माद, माणसांचे रोबो बनविण्याचे हत्यार, आणि जादूटोणाविरोधी कायदा अंनिसचे श्याम मानव यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची उपस्थिती राहणार आहे. ४ जानेवारी रोजी बहुजन समाज आणि धर्म या विषयावर अ‍ॅड. शंकरराव निकम व्याख्यान देणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच जिजाऊ ब्रिग्रेडद्वारा यावेळी महिला व मुलींसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

Web Title: Jijau lecture from today in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.