‘आयुष्यमान भारत’ योजनेचे आज उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:20 AM2018-09-23T00:20:33+5:302018-09-23T00:21:14+5:30

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे उद्घाटन २३ सप्टेंबर रोजी रांची (झारखंड) येथून देशभरात होणार आहे. तर राज्य स्तरावर मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.

 The inauguration of the 'Life Insurance' scheme today | ‘आयुष्यमान भारत’ योजनेचे आज उद्घाटन

‘आयुष्यमान भारत’ योजनेचे आज उद्घाटन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे उद्घाटन २३ सप्टेंबर रोजी रांची (झारखंड) येथून देशभरात होणार आहे. तर राज्य स्तरावर मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या योजनेच्या हिंगोली जिल्हा स्तवरील शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन सभागृहात दुपारी १२ ते २.३० या वेळेत होणार आहे. याबाबत पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी २१ सप्टेंबर रोजी बैठक घेतली होती.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तयारीच्या अनुषंगाने संबंधितांना निर्देश दिले. बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. गोपाल कदम, डॉ. मोसीन खान, प्रदीप आंधळे आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी व अति जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली, व या योजनेची माहिती डॉ. मोसीन खान, जिल्हा समन्वयक (मज्योफुजआयो) यांनी दिली. डॉ. गोपाल कदम यांनी आभार मानले.
२३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते २.३० वाजेपर्यंत सदरील योजनेचे हिंगोली जिल्हास्तरीय उद्घाटन पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती खा.राजीव सातव, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, आ. रामराव वडकुते, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. बिजेरया, आ. जयप्रकाश मुंदडा, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीनिवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची उपस्थिती राहणार आहे. नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी केले आहे.
योजने अंतर्गत नोंद झालेल्या लाभार्थ्यांपैकी काही निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात या योजनेचे ई-कार्ड वाटप करण्यात येणार आहे. या योजनेस पात्र लाभार्थी कुटुंंबांसाठी गरजेनुसार ५ लक्ष रुपयांपर्यंतचा लाभ वर्षातून एकवेळा उपचारासाठी मिळणार आहे. हिंगोली जिल्हनग़त आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे १०७०२८ कुटूंब लाभ घेणार आहेत. सध्या जिल्हा रुग्णालय, हिंगोलीचा या योजनेसाठी अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

Web Title:  The inauguration of the 'Life Insurance' scheme today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.