गहू काढणीस हार्वेस्टरलाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:18 AM2019-03-23T00:18:28+5:302019-03-23T00:18:48+5:30

कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे गहू काढणीस सुरुवात झाली आहे. सध्या शेतमजूर हळद काढणी व शिजवणीच्या कामात मग्न असल्याने शेतकरी हार्वेस्टर मशिनला प्राधान्य देत असल्याचे पहावयास मिळत आहे.

 Harvesters prefer wheat harvesters | गहू काढणीस हार्वेस्टरलाच पसंती

गहू काढणीस हार्वेस्टरलाच पसंती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा पांचाळ : कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे गहू काढणीस सुरुवात झाली आहे. सध्या शेतमजूर हळद काढणी व शिजवणीच्या कामात मग्न असल्याने शेतकरी हार्वेस्टर मशिनला प्राधान्य देत असल्याचे पहावयास मिळत आहे.
सध्या हळद काढणी व शिजवणीचे कामे सुरु असल्याने शेतकजुरांची कमतरता भासत आहे. तसेच ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने पाऊस पडल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. हार्वेस्टर मशिनमुळे गहू एका दिवसात घरी येत असल्याने शेतकरी हार्वेस्टर मशिनलाच पसंती देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या हळद काढणीचे कामे सुरु असल्याने गहू काढण्यासाठी शेतमजुरांची कमतरता भासत आहे. त्यासाठी वेळही जास्त लागतो, रात्र-दिवस शेतकऱ्यांना मरमर करावी लागते. परंतु हार्वेस्टरमुळे वेळेची बचत होते. नैसर्गिक आपत्तीपासूनही पिकाला वाचविता येते. या सर्व कारणांमुळे शेतकरी हार्वेस्टर मशिनलाच प्राधान्य देत आहेत. हार्वेस्टर एका दिवसात दहा एकरपर्यंत गव्हाची काढणी करते. हार्वेस्टरची गहू साठवण टाकी ९ क्विंटलची आहे.

 

Web Title:  Harvesters prefer wheat harvesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.