शेतकरी केंद्रबिंदू माना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 11:50 PM2017-12-09T23:50:14+5:302017-12-09T23:50:23+5:30

शेतकरी हा अनेक अडचणीचा सामना करीत शेतातून उत्पन्न काढोे. त्याला प्रत्येक वेळी निराशाच येत असल्याने तो खचून जात आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी कृषीउत्पन्न बाजार समितीने केंद्र बिंदु मानुन कामे केली तर त्याचा विकासा बरोबरच देशाचाही विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष (बापू) देशमुख यांनी ‘सहकारी चळवळीची वाटचाल, संधी व आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात केले.

Farmers regard the centerpiece | शेतकरी केंद्रबिंदू माना

शेतकरी केंद्रबिंदू माना

googlenewsNext
ठळक मुद्देसहकारावर चर्चासत्र : मंत्री सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शेतकरी हा अनेक अडचणीचा सामना करीत शेतातून उत्पन्न काढोे. त्याला प्रत्येक वेळी निराशाच येत असल्याने तो खचून जात आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी कृषीउत्पन्न बाजार समितीने केंद्र बिंदु मानुन कामे केली तर त्याचा विकासा बरोबरच देशाचाही विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष (बापू) देशमुख यांनी ‘सहकारी चळवळीची वाटचाल, संधी व आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात केले.
अध्यक्षस्थानी आ. तान्हाजी मुटकुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, सहकारी संस्था विभागीय सहनिबंधक राजेश सुरवसे, उज्ज्वला तांभाळे, माजी खा. अ‍ॅड. शिवाजी माने, माजी आ. कुंडलिक नागरे, गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शिवाजी जाधव, यशोदा कोरडे आदींची उपस्थिती होती. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत चर्चासत्राचे आयोजन केले होते. देशमुख म्हणाले, आप - आपल्या गावातील विविध कार्यकारी संस्थेचे सभासद झाले पाहिजे. एखादी कार्यकारी संस्था असेल तर दुसरी तयार करा. त्यातही जर तुम्हाला सभासद होऊ दिले जात नसेल तर मला पत्राद्वारे कळवा, असे शेतकºयांना सांगितले. तर महिलांनीही बचत गट पूर्णत: डोक्यातून काढून टाकत गावात एखादी संस्था सुरु केली तर खरोखरच अनेक महिलांना रोजगार मिळण्यास मदत होऊ शकते. तर सरकारच्या मदतीविना सव्वाआठशे संस्थांनी नवनवीन व्यवसाय सुरु केल्याचेही सांगितले. ग्रामीण भागातील संस्थांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे देणार आहे. या संस्थेचे स्वत:चे भागभांडवल आणि राज्य सरकारची मदतीतून कर्ज उपलब्ध करुन देता येऊन ५० हजार तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी सर्वांनीच एक पाऊल पुढे आले तर संपूर्ण महाराष्टÑ समृद्ध झाल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तर जास्तीत-जास्त शेतकºयांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेऊन आपली अडचण दूर करावी. जेव्हा भाव चांगला वाटला तेव्हा शेतकरी शेतीमालाची विक्री करु शकतात. जिल्ह्यामध्ये गोडाऊनची कमी असेल तर सरकारी, खाजगी गोदाम भाडेतत्त्वावर घेऊन ही योजना उत्कृष्टपणे राबविण्यासाठी कृषी समितीने पुढाकार घेण्यास सांगितले. तर जलयुक्तच्या कामामुळे शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न बºयापैकी सुटलेला आहे. शेतीला पाणी देता यावे म्हणून सौर कृषीपंप शेतकºयांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. विशेष म्हणजे ७० वर्षांत जेवढी तूर खरेदी केली नसेल एवढी तूर फक्त एका वर्षात खरेदी केली आहे. त्यामुळे आता त्या तुरीची डाळ बनवून रास्त भाव दुकानावर फक्त ५५ रुपये किलोप्रमाणे लाभार्थ्यांना मिळणार आहे. तसेच उसाचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावरही लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले. तर हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ठराव माझ्यापर्यंत आल्यानंतर तोदेखील मार्गी लावणार असल्याचे सांगितले. तर आ. मुटकुळे यांनी शेतकºयांची अजून चांगली सोय होण्यास कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी २५ एकर जमिनीची मागणी केली.
यावेळी इतरही मान्यवरांनी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात असलेल्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. सूत्रसंचालन के. के. शिंदे यांनी तर प्रस्ताविक जिल्हाउपनिबंधक सुधिर मैत्रेवार, आभार डॉ. सय्यद जब्बार पटेल यांनी मानले.
कर्जमाफी : खºया शेतकºयांनाच लाभ
कर्जमाफीवरुन आजही विरोधी पक्ष गोंधळ घालत आहेत. मात्र शेतकºयांनी भरलेल्या अर्जांची बारकाईने छाननी केली जात असून, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे अर्ज बाद करून खºयाच शेतकºयांना लाभ दिला जाणार आहे. येत्या मंगळवारपर्यंत त्या खºया शेतकºयांच्या खात्यावर पैसे पडणार आहेत. मागच्यावेळी जसी १० ते ११ महिने कर्जमाफी चालली तशी आता नसून पारदर्शकतेसाठी आॅनलाईन अर्ज मागविल्याचे मंत्री देशमुख यांनी सांगितले. तब्बल ७७ लाख शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. यामुळे काही काळ शेतकºयांना त्रास झाला.

Web Title: Farmers regard the centerpiece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.