शेवटपर्यंत शेतकऱ्यांना मिळेना कालव्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:08 AM2018-12-17T00:08:21+5:302018-12-17T00:08:39+5:30

कुरूंदा भागातील शेवटच्या टोकापर्यंत भाटेगाव कालव्याचे पाणी मिळत नसल्याने पिंपराळा, मंहमदपुरवाडी, माहगाव भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

 To the end the farmers get the canal water | शेवटपर्यंत शेतकऱ्यांना मिळेना कालव्याचे पाणी

शेवटपर्यंत शेतकऱ्यांना मिळेना कालव्याचे पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : कुरूंदा भागातील शेवटच्या टोकापर्यंत भाटेगाव कालव्याचे पाणी मिळत नसल्याने पिंपराळा, मंहमदपुरवाडी, माहगाव भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकºयांच्या जमिनी गेल्या पण कालव्याद्वारे अजिबात पाणी मिळत नसल्याने इसापूर धरणाच्या पाण्यापासून शेतकºयांना वंचित रहावे लागत आहे. पाण्याचे नियोजन पैनगंगा प्रकल्पाच्या सिंचन विभागाला लागलेला नसल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचताना दिसत नाही.
कुरूंदा भागामध्ये इसापूर धरणाचे पाणी भाटेगाव कालव्याद्वारे येते. कुरूंदा गावाच्या पुढे पाणी पोहचण्यास अडथळे निर्माण झाल्याने किंवा नियोजनअभावी पिंपराळा, माहगाव, मंहमदपुरवाडी या गावांना पाणी मिळत नाही. अनेक वर्ष झाले या तिन्ही गावातील जमिनी कालव्यासाठी गेल्या. परंतु या भागातील शेतकºयांना पाणी मिळालेच नाही. पिंपराळा, महंमदपूरवाडी, माहगाव भागातील शेतकरी कालव्याची पाणीपट्टी उपलब्ध करून देखील त्यांना पाणी देण्यास दिरंगाई होत आहे. सिंचन विभागाचा नियोजन लागलेला नाही. चोख नियोजनाची आवश्यकता आहे. या भागाकरिता जवळपास पाच ते सात दिवस पाणी कालव्यात उपलब्ध असतो. नियोजनचा अभाव असल्याने सात दिवसांमध्येही शेवटच्या भागापर्यंत पाणी मिळत नाही. मोठी कसरत करून देखील पाणी मिळत नसल्याने शेतकºयांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. पिंपराळा, माहगाव, मंहमदपुरवाडी भागातील शेतकºयांनी या प्रकरणी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे. आंदोलनाचा इशाराही दिला आहे. पिंपराळा भागातील शेतकºयांना कालवा असताना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने पिंपराळा माहगाव भागातील हळदीचे क्षेत्र पाण्याअभावी धोक्यात आले. तर रब्बी पेरणी देखील कोलमडली आहे. आतापासून पाणी पातळी खालावल्याने धरणाच्या पाण्यावरच बागायती पिकासह हळद उत्पादन अवलंबून होते. त्यात शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळण्यास झालेली दिरंगाई या भागातील शेतकºयांसाठी अडचणीची ठरली आहे.
सिंचनाच्या बाबतीत हिंगोली जिल्हा पिछाडीवरच आहे. इसापूर धरणाचे पाणी भाटेगाव कालव्याच्य पट्ट्यापर्यंत कळमनुरीचा मोजका तर वसमत तालुक्यातील कुरूंदा भागापर्यंत फायदा होता. पाण्याची पहिली पाळी नांदेड जिल्ह्याला अगोदर जाते. त्यानंतर या भागातील पाणी मिळते. त्यात शेवटच्या टोकला पाणी उपलब्धही होत नाही. कुरूंदा भागात पाणी येऊनही दाभडीच्या नाल्याद्वारे पुर्णा प्रकल्पाच्या कालव्यातून मालेगाव भागात पाणी जाते. पाणी कोणीकडेही त्याचा अधिकचा फायदा नांदेड जिल्ह्यालाच होतो. आरक्षीत पाण्याचा अधिकार फारसा वापरल्या जात नाही. त्यात राजकीय वजन असणारे नांदेडचे वजन अधिकपडते. एका प्रकारे जिल्ह्याचा विचार केल्यास केवळ नावालाच पाणी दिल्या जाते. शेवटच्या टोकापर्यंत पाणी देण्याचे नियोजन अद्याप आखल्या न गेल्याने धरणाचे पाणी पिंपराळा परिसरात मिळताना दिसत नाही. पिंपराळा भागापर्यंत पाणी देण्याचे नियोजन होते. तसे आम्हीपर्यंत देखील केले. परंतु कालव्यामध्ये जागोजागी पाणी उपसासाठी पाईप टाकले आहेत. त्यामुळे प्रयत्न करुनही पाणी शेवटच्या भागापर्यंत गेले नाही. पाईप टाकणाºया या शेतकºयांना नोटीसा दिल्या असून कार्यवाही केल्या जाईल, असे सिंचन शाखाअभियंता पत्की यांनी सांगितले.

Web Title:  To the end the farmers get the canal water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.