दुष्काळाचा बाजारपेठेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:21 AM2019-02-12T00:21:42+5:302019-02-12T00:22:07+5:30

सततच्या दुष्काळामुळे सध्या बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जवळा बाजारसह परिसरात बागायती क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे या परिसरामध्ये हळद, ऊस, केळी, भुईमुगासारखे नगदी पिके घेतली जात होती.

 The drought market hit | दुष्काळाचा बाजारपेठेला फटका

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : सततच्या दुष्काळामुळे सध्या बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
जवळा बाजारसह परिसरात बागायती क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे या परिसरामध्ये हळद, ऊस, केळी, भुईमुगासारखे नगदी पिके घेतली जात होती.
मात्र गत दोन-तीन वर्षांपासून अल्पपर्जन्यमानामुळे धरण क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे बागायती परिसरामध्ये कोरडवाहू क्षेत्र निर्माण झाले. याचा सर्वांत फटका जवळा बाजार बाजारपेठेवर बसत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे कापड, किराणा, कटलरी, कृषी केंद्र, हार्डवेअर सह अनेक व्यापाऱ्याला ग्राहक नसल्यामुळे चांगलाच फटका बसला आहे. सध्या बाजारपेठेत दिवसभर सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे व्यापाºयांना जागेचे भाडे, नौकर खर्च निघणे कठीण झाले. विक्रेत्यांना ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसावे लागत आहे. त्यामुळे दुष्काळचा फटका चांगला बसत आहे.

Web Title:  The drought market hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.