नाथजोगी समाजाचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:34 AM2018-07-04T00:34:38+5:302018-07-04T00:35:20+5:30

मोबाईलच्या सहाय्याने विविध व्हिडीओ क्लिप पसरवून मुले चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. मात्र या प्रकारामुळे भटक्या जमातीतील लोकांचा नाहक बळी जात आहे.

 Disinterested Community | नाथजोगी समाजाचे निवेदन

नाथजोगी समाजाचे निवेदन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मोबाईलच्या सहाय्याने विविध व्हिडीओ क्लिप पसरवून मुले चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. मात्र या प्रकारामुळे भटक्या जमातीतील लोकांचा नाहक बळी जात आहे. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे भटक्या जमातीतील पाच लोकांची हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातील नाथजोगी समाजबांधवांनी ३ जुलै रोजी प्रशासनास निवेदन दिले.
राईनपाडा येथील घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातील विविध भटक्या जमातीतील समाजबांधव मंगळवारी एकत्र जमले होते. शिष्टमंडळाने खा. राजीव सातव यांची भेट घेऊन राज्यभरात भटक्या समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत व्यथा मांडल्या. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात धुळे जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ निवेदन सादर केले. ५ जुलै रोजी जिल्हा कचेरीवर समाजबांधवांतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. भटके विमुक्त नाथजोगी, डवरी, नाथपंथी, गोसावी समाजावर दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने भिक्षा मागून पोट भरणाºया व्यक्तींना ओळखपत्र द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनावर नारायण बाबर, आप्पा शिंदे, आप्पाजी शिंदे सावंगीकर, नाना सोळंके, रामा शिंदे, अंबादास शिंदे, भैरू सोळंके आदींच्या स्वाक्षºया आहेत.
शासन दुर्लक्षाचे बळी-सातव
राइनपाडा घटनेत पाच जणांचा गेलेला बळी हा शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाचा परिणाम आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडत असताना कोणतीच जागृती नाही. समाजात तेढ निर्माण करणाºया या घटनांना शासनच जबाबदार आहे. यातील मयताच्या कुटुंबांना प्रत्येकी ५0 लाखांची मदत व्हावी, अशी मागणी खा.राजीव सातव यांनी केली. तर विविध प्रथा, परंपरांचे रक्षण करणाºया या समाजाला भविष्यात अशा घटनांना सामोरे जावे लागू नये, अशी व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी केली.

Web Title:  Disinterested Community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.