कापसाला मिळतोय ५५०० रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:07 AM2019-01-05T00:07:06+5:302019-01-05T00:07:23+5:30

औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून कापसाची ५५०० रुपये या भावाने खरेदी केली जात असल्यामुळे सध्या शेतकरी भाववाढीची आशा सोडून कापसाची विक्री मोठ्या प्रमाणावर करीत आहेत.

 Cotton is available at Rs 5500 | कापसाला मिळतोय ५५०० रुपये भाव

कापसाला मिळतोय ५५०० रुपये भाव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून कापसाची ५५०० रुपये या भावाने खरेदी केली जात असल्यामुळे सध्या शेतकरी भाववाढीची आशा सोडून कापसाची विक्री मोठ्या प्रमाणावर करीत आहेत.
जवळा परिसरामध्ये कापसाची लागवड क्षेत्र अल्प असून यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनही घटले. एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन झाले आहे. आॅक्टोबर- नोव्हेंबर महिन्यामध्ये कापसाला ५९०० रुपये भाव मिळत होता. मात्र यावर्षी कापसाचे क्षेत्र कमी व उत्पादनही अल्पप्रमाणावर झाले. त्यामुळे यावर्षी कापसाला बाजारपेठेत भाव येईल या आशेने शेतकºयांनी कापूस विकला नाही. मात्र डिसेंबर सुरू होताच कापसाचे भाव उतरले. सध्या व्यापारी ५५०० रुपये प्रतिदराने खरेदी करत आहे. सीसीआय ही शासनाच्या हमीभावाने म्हणजे ५४५० रुपये प्रतिदराने खरेदी करत आहे. पण सीसीआयऐवजी शेतकरी व्यापाºयाला कापूस विक्री करत आहेत. तर फरदड कापसाला ५ हजार रुपये प्रतिक्विंटल रुपयांपासून भाव मिळत आहे. भाववाढीची आशा संपल्यामुळे बाजारपेठेत सध्या कापसाची आवक वाढत आहे. त्यामुळे दररोज कापसाच्या दोन ते तीन गाड्या भरत आहेत. यावर्षी मात्र कापसाच्या दोन वेचणीमध्येच पºहाट्या झाल्या आहेत.

Web Title:  Cotton is available at Rs 5500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.