हिंगोली येथील प्रसिद्ध उद्योगपती ब्रिजलाल खुराणा यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:59 PM2018-03-13T12:59:35+5:302018-03-13T12:59:35+5:30

हिंगोली येथील प्रसिद्ध उद्योगपती तथा व्यावसायिक ब्रिजलाल खुराणा (वय 84) हे गेल्या दिड महिन्याभरापासून आजारी होते.

Brijlal Khurana, famous businessman of Hingoli died | हिंगोली येथील प्रसिद्ध उद्योगपती ब्रिजलाल खुराणा यांचे निधन 

हिंगोली येथील प्रसिद्ध उद्योगपती ब्रिजलाल खुराणा यांचे निधन 

googlenewsNext

हिंगोली : येथील प्रसिद्ध उद्योगपती श्री. ब्रिजलाल टेहलाराम खूराणा ( वय-84) यांचे औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हाॅस्पीटल मध्ये उपचार घेत असताना काल मध्यरात्री २. ३० वाजेच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. 

हिंगोली येथील प्रसिद्ध उद्योगपती तथा व्यावसायिक ब्रिजलाल खुराणा (वय 84) हे गेल्या दिड महिन्याभरापासून आजारी होते. परंतु गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती नाजूक बनल्यामुळे त्यांना हिंगोली येथून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. रूग्णालयात उपचार सुरू असतानाच ब्रिजलाल यांची प्राणज्योत काल मध्यरात्री २.३० वाजेच्या दरम्यान माळवली. ब्रिजलाल यांच्या पश्चात राणा तिलकराज,जनकराज, ललितराज, जगजितराज, हंसराज व मंजूबाई गुल्हाटी ही मुलगी आहे. यासोबतच नातू पणतू असा मोठा परिवार आहे. 

Web Title: Brijlal Khurana, famous businessman of Hingoli died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.