८७५ मुख्याध्यापकांचे मानधन रखडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:42 AM2018-08-20T00:42:03+5:302018-08-20T00:42:26+5:30

शालेय पोषण आहार योजनेचे जमा खर्च यासह इतर लेखाजोखा लिहण्यासाठी मुख्याध्यापकांना महिन्याला १०० रूपये तर वार्षिक १ हजार रूपये दिले जातात. परंतु मागील दोन वर्षांपासून ही रक्कम मुख्याध्यापकांच्या हाती पडली नाही. ३१ मार्च रोजीच एसबीआय बँककडे धनादेश देऊनही ही रक्कम अद्याप ८७५ मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा झाली नाही.

 875 Principals of the Principal | ८७५ मुख्याध्यापकांचे मानधन रखडलेलेच

८७५ मुख्याध्यापकांचे मानधन रखडलेलेच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शालेय पोषण आहार योजनेचे जमा खर्च यासह इतर लेखाजोखा लिहण्यासाठी मुख्याध्यापकांना महिन्याला १०० रूपये तर वार्षिक १ हजार रूपये दिले जातात. परंतु मागील दोन वर्षांपासून ही रक्कम मुख्याध्यापकांच्या हाती पडली नाही. ३१ मार्च रोजीच एसबीआय बँककडे धनादेश देऊनही ही रक्कम अद्याप ८७५ मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा झाली नाही.
शालेय पोषण आहार योजनेच्या रेकॉर्डची कामे करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. या कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा शंभर रुपए याप्रमाणे वषार्काठी १ हजार रुपए मानधन दिले जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांच्या खात्यावर मानधनच जमाच झाले नाही. जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेच्या कामात अनियमता हा नेहमीचाच विषय आहे. जिल्हाभरात जि. प. च्या शाळांमध्ये जवळपास ८०० च्यावर मुख्याध्यापक कार्यरत आहेत. या सर्व शाळेमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. सदर योजनेची लेखा-जोखा ठेवण्याच्या कामाची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर आहे. शासनाकडून उपलब्ध झालेला तांदूळ, धान्यादी माल व इतर माहितीचे रेकॉर्डची कामे मुख्याध्यापक करतात. सदर कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा १०० रुपये म्हणजेच वार्षिक १ हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु शासनाकडून निधी उपलब्ध होऊनही अद्याप एकाच्याही खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली नाही.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर व जि. प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी शिक्षण विभागाकडे हा प्रश्न वारंवार मांडला. त्यानंतर विभागीय आयुक्त शिक्षण उपसंचालक औरंगाबाद, शिक्षण संचालक (पुणे) यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनही दिले. शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार विभागाकडे तर याबाबत कधीच माहिती उपलब्ध नसते. संबंधित कर्मचारी अधिकाऱ्याकडेच माहितीचे रेकॉर्ड असते, असे सांगत हात झटकतात. मानधन खात्यावर जमा केले जात नसल्यामुळे विविध शाळांतील मुख्याध्यापक सोमवारी बँकेला जाब विचारणार आहेत.
पाच महिन्यांपासून बँकेत धनादेश पडून...
भारतीय स्टेट बँकेत मुख्यध्यापकांच्या २०१७-१८ मधील मानधनासाठी धनादेश ३१ मार्च २०१८ रोजीच बँकेत जमा करण्यात आला आहे.पंरतु बँकेने अद्याप मुख्याध्यापकांच्या खात्यावर शासनाकडून मिळालेली मानधनाची रक्कम वर्ग केली नाही. त्यामुळे याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. धनादेश देऊनही खात्यावर रक्कम वर्ग होत नसल्याचे कारण हा शोधाचा विषय आहे. मागील दोन वर्षांपासून मानधन मिळत नसल्याची मुख्याध्यापकांची तक्रार आहे. याबाबत विविध शाळांतील मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाºयांकडे धाव घेत अनेकदा मानधनाची मागणीही केली होती.

Web Title:  875 Principals of the Principal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.