३३ हजारांवर अर्ज धूळ खातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:51 AM2018-02-16T00:51:55+5:302018-02-16T00:51:59+5:30

मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला अजूनही अंतिम स्वरुप आले नाही. जवळपास ३३ हजार ३५ अर्जधारक शेतक-यांना कर्जमाफी मिळणार की नाही? हा प्रश्न कायम आहे. यापैकी २९ हजार ६८४ अर्ज तालुका समितीने दुरुस्ती करून शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केले असून यातून ग्रीन लिस्टमध्ये आलेल्यांना कर्जमाफी मिळू शकते.

 33 thousand applications have become dust | ३३ हजारांवर अर्ज धूळ खातच

३३ हजारांवर अर्ज धूळ खातच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला अजूनही अंतिम स्वरुप आले नाही. जवळपास ३३ हजार ३५ अर्जधारक शेतक-यांना कर्जमाफी मिळणार की नाही? हा प्रश्न कायम आहे. यापैकी २९ हजार ६८४ अर्ज तालुका समितीने दुरुस्ती करून शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केले असून यातून ग्रीन लिस्टमध्ये आलेल्यांना कर्जमाफी मिळू शकते.
शासनाने कर्जमाफीसाठी पात्र ठरण्यात कोणतीही अडचण नसलेल्या ३३ हजार ९९३ शेतकºयांसाठी ११९.२८ कोटी रुपये बँकांकडे वर्ग केले आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ हजार ७७२ खातेदारांना २४.४७ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकेच्या ११ हजार ४५ जणांना ६२.२४ कोटी तर ग्रामीण बँकेच्या ६१७६ खातेदारांसाठी ३२.५५ कोटी रुपये वर्ग केले आहेत. मात्र यापैकी ३३ हजार ६0८ शेतकºयांच्या खात्यावर १0३.९८ कोटी प्रत्यक्ष जमा झाले आहेत.
याशिवाय माहिती जुळत नसल्याने प्रलंबित असलेले ३३0३५ अर्ज आहेत. तर काहींचे अर्जच दुहेरी, तिहेरी असल्याने एकूण ३३ हजार ४६२ अर्ज तालुका समितीकडे निर्णयास्तव पाठविले होते. त्यात दुरुस्ती झाल्यानंतर समितीने २९ हजार ६८४ अर्ज शासनाच्या वेबसाईटवर अपलोडींगला पाठविले आहेत. यात हिंगोली-७९६७, वसमत-६९९६, औंढा ना.-२६९६, कळमनुरी-६५३२ तर सेनगाव- ५४९१ अशी तालुकानिहाय अर्जांची संख्या आहे. या अर्जांची राज्य समितीकडे तपासणी झाल्यानंतर निकषात किती बसतील, याचा काही नेम नाही. या अर्जांमधून निकषात बसलेल्या शेतकºयांची ग्रीन लिस्ट आल्यास संबंधितांना कर्जमाफीचा लाभ मिळणे शक्य आहे. तर हिंगोली-४४९, वसमत-९७0, औंढा ८१७, कळमनुरी-६६१ व सेनगाव ८८१ असे ३७७८ अर्ज बँकांच्या उदासीनतेमुळे तालुका समित्यांकडेच पडून आहेत. हे अर्ज अपलोड करण्याची मुदत संपूनही यात काहीच झालेले नाही.
उदासीनता : दीड लाखांवरील कर्ज
ज्यांच्याकडे दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज होते अशांना उर्वरित रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. असे ३३८५ शेतकरी आहेत. यात जि.म.स.च्या ११७९ शेतकºयांना ९१ लाख तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या २२0६ शेतकºयांना १४.३७ कोटींचा लाभ मिळू शकतो. मात्र उर्वरित रक्कम न
भरल्याने कर्जमाफीचे १५.२९ कोटी रुपयेही तसेच पडून आहेत. ही उर्वरित रक्कम भरण्याकडे शेतकºयांचा फारसा कल नाही. त्यातच यंदा अल्पपर्जन्यामुळे खरीप तर अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबीला फटका बसला. त्यामुळे याला प्रतिसाद मिळणे शक्य नाही.
कर्जमाफीसाठी १ लाख ५ हजार शेतकºयांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३६९९३ पात्र ठरले. यातून ३३६0८ जणांना प्रत्यक्ष कर्जमाफी मिळाली. तर त्रुटी दूर करून अजून २९६८४ अर्ज शासनाकडे गेले आहेत.

Web Title:  33 thousand applications have become dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.