२११ ग्रामपंचायत सदस्य बसले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:24 AM2018-04-17T01:24:09+5:302018-04-17T01:24:09+5:30

दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्याने जिल्ह्यातील तब्बल २११ ग्रा.पं.सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून काही ठिकाणी तर एकही सदस्य न उरल्याचे चित्र दिसून येत आहे.

 211 gram panchayat members sit at home | २११ ग्रामपंचायत सदस्य बसले घरी

२११ ग्रामपंचायत सदस्य बसले घरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्याने जिल्ह्यातील तब्बल २११ ग्रा.पं.सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून काही ठिकाणी तर एकही सदस्य न उरल्याचे चित्र दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात आॅगस्ट व आॅक्टोबर २0१७ मध्ये झालेल्या अनुक्रमे १३ व ४९ ग्रा.पं.च्या निवडणुकीतील तब्बल २२३ उमेदवारांनी निवडणूक खर्च दाखल केला नव्हता. अशा सर्व उमेदवारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यावर २२ ते ३१ जानेवारीदरम्यान सुनावणी झाली होती.मात्र वरीलपैकी केवळ १0 वगळता उर्वरितांनी निवडणूक खर्च दाखल केला नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी पी.एन. बोरगावकर यांनी या सर्व सदस्यांना अनर्ह ठरविण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्याचे अंतिम आदेश सोमवारी आता निघाले असून त्यात २११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
हिंगोली तालुक्यातील कोथळज येथील बबनराव मुंढे, भटसावंगी येथील नामदेव ठोंबरे, केशव कºहे, मुक्ता मस्के, भटसावंगी तांडा येथील सुभाष जाधव, सुला जाधव, कमलबाई राठोड, शांताबाई राठोड, कैलास राठोड, यशवंत राठोड, गोपीचंद राठोड, यशोदा जाधव, गोपाबाई चव्हाण, शिवाजी राठोड, यशोदा आडे, सविता जाधव, प्रवीण राठोड, वडद/एकांबा येथील राजू वसू, भागवत वसू, संतुक पिंपरी येथील उत्तम दीपके, संजय दीपके, साजीयाबी सय्यद नाझीम, शकी सय्यद हबीब, काळकोंडी येथील विनोद जाधव, रूख्मीना जाधव, इडोळी येथील पुष्पा पानवट्टे, गजानन घाटूळकर, पुष्पा भिसे, कलावती टेकाळे, सविता जाधव, सयाबाई जाधव, बद्रीनाथ पानपट्टे, प्रल्हाद टेकाळे, ब्रह्मपुरी येथील अनूसया रणबावळे, सिंधू तावरे, रामेश्वर लोकडे, मालवाडी-चिखलवाडी येथील पवन चव्हाण, प्रियंका जराड, कविता बुद्रूक, अजय मिटकरे, आडगाव येथील सुनीता मुटकुळे, रमेश मुटकुळे, साधना हनवते, हनवतखेडा येथील प्रभापती आठरे, लक्ष्मीबाई आठरे, गीताबाई आठरे, राजेश्वर कीर्तनकार, विशाल कांबळे, भाग्यश्री कांबळे, भानुदास मुटकुळे, घोटा येथील नर्मदाबाई पावडे, उषाताई शेळके, आंबिका शेळके, शांताबाई शेळके, शिवाजी पातळे, वैजनाथ पावडे, मंगल पावडे, रेणुकाबाई गांजरे, कांताबाई शेळके, वैशाली शेळके, गयाबाई शेळके, रामेश्वर शेळके, भगवान शेळके, नितीन वानखेडे, वर्षा पावडे, सुभद्राबाई लांबडे, कौशल्या गडगिळे, कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर त. शेवाळा येथील संभाजी खिल्लारे, राजाबाई बहात्तरे, योजना टाक, नारायण उपरे, अर्चना बुरकुले, पांडुरंग खिल्लारे, मोहन खिल्लारे, रमेश माने, निर्मलाबाई उपरे, घोडा येथील कविता पतंगे, टाकळी कान्होबा येथील रूख्मीना भालेराव, येलकी येथील कामिनी पतंगे, शशिकला भुक्तर, भगवानराव पतंगे, नजीरा बेगम पठाण, किशोरखॉ पठाण, कैलास कापसे, वारंगाफाटा येथील संगीता नरवाडे, विनायक पतंगे, पंडितराव कदम, गौतम थोरात, कुर्तडी येथील सपना कदम, विमल नरवाडे, गणपतराव लुटे, लक्ष्मण लुटे, पंचफुलाबाई वाठोरे, रत्नमाला नरवाडे, दत्ता कदम, बाळू नरवाडे, बाबूराव नरवाडे, दीपक जाधव, राजकुमार जाधव, श्रीनिवास पानपट्टे, जिजाजी पारडकर, कांताबाई बाराटे, गंगासागर लुटे, भारताबाई जाधव, सुरेखा जाधव, कुंभारवाडी त. कुर्तडी येथील मारोती शेळके, मसोड येथील तानाजी सातव, शे. गौस शे.अहमद, मंगलाबाई सातव, सुमेध मोगले, बोल्डा येथील जनाबाई जोगदंड, श्रावण ढोकणे, शे.शमीमबी जानी, नामदेव ढोकणे, वैशाली खंडागळे, रत्नमाला ढोकणे, ज्योती कांबळे, ज्योती ढोकणे, सेनगाव तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील दिनकर मस्के, शारदा ठोके, विशाल ठोके, सागर गडदे, हाताळा येथील शोभा काळे, सुनीता राऊत, सारिका चोपडे, मदन काळे, दीपक काळे, इंदूबाई काळे, गोपाल इंगोले, बबन खिल्लारे, लीलाबाई काळे, जिजाबाई गावंडे, वलाना येथील गोदावरी हेंबाडे, औंढा तालुक्यात उखळी येथील रेखा गायकवाड, लीलावती गायकवाड, वामनराव गायकवाड, शालूबाई वाव्हळ, अनुसया अंभोरे, प्रकाश वाघमारे, रामेश्वर येथील मीना घाटोळकर, उत्तम जाधव, प्रियंका शेगुकर, ककनाजी ठाकरे, देवीदास ठाकरे, मंजुळाबाई येळणे, कुशावती ढाकरे, शिरडशहापूर येथील नाजेरा बेगम सय्यद, रशिद जानमहंमद शेख, प्रगती ढेंबरे, नंदा सूर्यतळ, सागर रावळे, गजानन स्वामी, पांडुरंग शेळके, सुशिल अकमार, विलोप परतवार, उंडेगाव येथील भाऊसाहेब वावरे, रंजनाबाई वावरे, आशामती डोबे, तारामती देशमुख, माणिक देशमुख, आशामती पोटेकर, आशामती भारशंकर, गोजेगाव येथील सुनीता खिल्लारे, सचिन खिल्लारे, शिवप्रसाद सांगळे, शारदा नागरे, महादू जायभाये, लक्ष्मीबाई खिल्लारे, राम खिल्लारे, प्रभावती सांगळे, अंजनाबाई जायभाये, वसमत तालुक्यातील कौठा येथील रेशमजी खराटे, साळूराम खराटे, वैभव गायकवाड, पंडित खराटे, लहान येथील सीमा कोरडे, संदीप कोरडे, प्रयागबाई कोरडे, मंगलाबाई कोरडे, कुडाळा येथील व्यंकटी ढवळे, राजेश चव्हाण, विरेगाव येथील बालाजी डुकरे, गंगूबाई जाधव, सखूबाई जाधव, विजयाबाई डुकरे, पद्मीनबाई डुकरे, मीराबाई सूर्य, वैजयंतीबाई सूर्य, विजय सूर्य, परळी येथील हनुमान दशरथे, मुंजाजी क्षीरसागर, प्रभावती दशरथे, तारामती दशरथे, बन्सीधर दशरथे, हेमराज दशरथे, अरूणा क्षीरसागर, सौमित्रा दशरथे, मारोती दशरथे, वाखारी येथील ज्योती अंभोरे, संगीता टोरे, एकनाथ अंभोरे, मीराबाई गवंदे, अमोल ढोेरे, अश्विनी पांचाळ, कमलबाई ढोरे, दीपाली ढोरे, ज्योती अंभोरे, रमाबाई गवंदे, गजानन गंगावळे, महमदपूरवाडी येथील नीलाबाई वायकोळे आदींचा समावेश आहे.
यात गोकर्णा जायभाये, लीला जायभाय, कांचन घुगे, जाईबाई कपाटे, सखाराम गायकवाड, जिजाबा वसू, सुनीता आठरे, वैशाली शेळके, शांता शेळके, सीमा दराडे यांनी निवडणूक खर्च दाखल केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे हे १0 सदस्य या कारवाईपासून बचावले आहेत.
यामध्ये काही ग्रा.पं.त तर सरपंच व सर्वच सदस्यांना निवडणूक खर्च सादर न केल्याने कारवाईला सामोरे जावे लागले. एकीकडे ग्रा.पं.चे बळकटीकरण करण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे निर्वाचितांना खर्च सादर करण्याचेही भान नसल्याचे दिसते.
जिल्हाधिकाºयांनी सदस्यत्व रद्द केलेल्यांना विभागीय आयुक्तांकडे अपिल करण्याची एक संधी आहे. मात्र तेथेही पुरावे सादर करता न आल्यास ही संधी औटघटकेचा दिलासाच ठरू शकते.

Web Title:  211 gram panchayat members sit at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.